तुमचं आमचं जमल…

भारत आणि अमेरिकेत व्यापार करारावर सहमती झाल्यानंतर भारतीय वस्तूंवरील आयात शुल्क अमेरिका 18 टक्क्यांपर्यंत कमी करेल, या घोषणेनंतर मंगळवारी शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी २.५ टक्क्यांनी वाढून बंद झाले.तर रुपया डॉलर च्या तुलनेत बळकट झाला आहे. या व्यापार करारामुळे भारतीय रुपयामध्ये लक्षणीय वाढ झाली, जो १% पेक्षा जास्त वाढून प्रति अमेरिकन डॉलर ९०.४० च्या पातळीवर पोहोचला.
शेअर बाजारात तेजीच्या सुरुवातीनंतर, ३० शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स ४,२०५.२७ अंकांनी किंवा ५.१४ टक्क्यांनी उसळी घेऊन ८५,८७१.७३ च्या दिवसाच्या उच्चांकावर पोहोचला. नंतर तो २,०७२.६७ अंकांनी किंवा २.५४ टक्क्यांनी वाढून ८३,७३९.१३ वर बंद झाला.
भारत-अमेरिका संबंधांमधील टॅरिफ आणि तणावामुळे, परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारापासून अंतर ठेवताना दिसत होते आणि सतत विक्री होत होती .पण हे चित्र बदलेल असे वाटते. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अमेरिकेने लावलेले शुल्क लागू झाल्यामुळे, रत्न आणि दागिन्यांच्या व्यापारात सुमारे ४४ टक्क्यांची मोठी घट झाली, परिणामी दागिने निर्यातदारांना मोठे नुकसान झाले. जयपूरच्या दागिने निर्यातीचा मोठा भाग अमेरिकेशी आहे.या उद्योगाच्या अंदाजानुसार, एकूण १८,००० कोटी रुपयांच्या निर्यातीपैकी, सुमारे ३,२०० कोटी रुपयांची निर्यात केवळ अमेरिकन बाजारात होते, ज्यामुळे या शुल्कांचा परिणाम गंभीर ठरला होता.
या बाबत जयपूर ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष आलोक सोन्खिया म्हणाले, “आम्ही या नवीन व्यापार कराराबद्दल खूप आनंदी आहोत. गेल्या वर्षी, ख्रिसमसच्या हंगामाच्या अगदी आधी शुल्क लागू झाल्यामुळे आमच्या निर्यातीत मोठी घट झाली होती. मोठ्या प्रमाणावर ऑर्डर्स रद्द झाल्या होत्या. जास्त नफा कमावणाऱ्या काही निर्यातदारांना त्यांचे माल पाठवण्याचे नियोजन बदलणे शक्य झाले असले तरी, कमी नफ्यावर व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांना मोठे नुकसान सहन करावे लागले.”
रुपयाचे बळकटीकरण या व्यापार करारामुळे भारतीय रुपयामध्ये लक्षणीय वाढ झाली, जो १% पेक्षा जास्त वाढून प्रति अमेरिकन डॉलर ९०.४० च्या पातळीवर पोहोचला.
तर सोने आणि चांदी ची गडगडणारी स्थिती आज सावरली ति १० ग्रॅम सोन्याचा व्यापार सामान्यतः १०-ग्रॅम (तोळा) युनिटमध्ये केला जातो. अंदाजानुसार: किमान मर्यादा ($6,000/औंस): अंदाजे ₹1,74,386 प्रति १० ग्रॅम. कमाल मर्यादा ($6,300/औंस): अंदाजे ₹1,83,105 प्रति १० ग्रॅम दरम्यान असणार आहे.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवरील शुल्क १८ टक्क्यांपर्यंत कमी करत असल्याचे सांगितले. त्यांनी यापूर्वी २५ टक्के प्रतिशोधात्मक शुल्क लावले होते, तसेच भारताने मॉस्कोकडून तेल खरेदी केल्याबद्दल अतिरिक्त २५ टक्के शुल्क आकारले होते.
“मेड इन इंडिया उत्पादनांवर आता अमेरिकेत १८ टक्के कमी शुल्क लागेल याचा आनंद आहे,” असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले. “जेव्हा दोन मोठ्या अर्थव्यवस्था आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देश एकत्र काम करतात, तेव्हा त्याचा आपल्या लोकांना फायदा होतो आणि परस्पर फायदेशीर सहकार्यासाठी प्रचंड संधी उपलब्ध होतात,” असे श्री. मोदींनी त्यांच्या ‘एक्स’वरील पोस्टमध्ये मध्ये केला आहे.
या करारावर राहुल गांधींचा दावा असा आहे की पंतप्रधान मोदी ‘समझोता’ करत आहेत,या विषयावर विरोधी पक्षनेत्याला संसदेत बोलू देण्यास घाबरत असल्याची टिका केली.
हा करार भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करण्याचे आश्वासन दिल्यामुळे केला जात असल्याचे अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे मात्र याबाबत रशियाला भारताकडून रशियन तेलाची खरेदी थांबवण्याबाबत कोणतेही निवेदन मिळालेले नाही, असे क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी मंगळवारी (३ फेब्रुवारी २०२६) सांगितले.
रशियन माध्यमांच्या वृत्तानुसार, श्री. पेस्कोव्ह यांनी असेही सांगितले की, रशियाचा भारतासोबतचे आपले संबंध सर्वतोपरीने विकसित करण्याचा मानस आहे. “भारताने तेलाची खरेदी थांबवण्याबाबत मॉस्कोला अद्याप कोणतेही निवेदन मिळालेले नाही,” असे पेस्कोव्ह यांनी सांगितल्याचे रशियन माध्यमांनी म्हटले आहे.
अमेरिका सोबत होणारा हा करार प्रलंबित राहिल्याने दरम्यानच्या काळात भारताने अन्य देशांच्या सोबत करार करून आपल्या व्यापारात नवीन संधी मिळविल्या आहे. युरोपीय युनियन सोबतचा करार देखिल बरीच वर्ष रखडला होता.



