माजी विद्यार्थ्यांच्या कडून झालेला सत्कार हाच खरा नागरी पुरस्कार:सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

अहमदपूर दि. 13.07.26 यशवंत विद्यालयाचे पर्यवेक्षक तथा पत्रकार रामलिंग तत्तापूरे सर यांनी त्यांच्या सेवेच्या काळामध्ये अत्यंत विनम्र पूर्वक, निष्ठापूर्वक, आणि श्रद्धापूर्वक अध्ययन अध्यापनाचे काम केल्यामुळे त्यांचा माजी विद्यार्थ्यांच्या कडून झालेला सत्कार आज खरा नागरिक पुरस्कार आहे असे आग्रही प्रतिपादन सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी केले.
दि.12 रोजी प्रसाद गार्डन मंगल कार्यालयात माजी विद्यार्थ्यांच्या वतीने आयोजित शिल्पकाराची सेवापूर्ती आणि कार्य गौरव सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भक्ती स्थळाचे प्रमुख प.पू. आचार्य गुरुराज स्वामी महाराज, व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे, शिक्षक आमदार विक्रम काळे, शिक्षण महर्षी डी.बी. लोहारे गुरुजी, वरिष्ठ वृत्त निवेदक विलास बडे, माजी मंत्री बाळासाहेब जाधव, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके- पाटील, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सचिव शिवानंद हेगणे, काँग्रेसचे जिल्हा सचिव सांब महाजन,नगराध्यक्ष ऍडव्होकेट स्वप्निल व्हत्ते, उपनगराध्यक्ष अय्याज शेख, टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक सांगवीकर, उपाध्यक्ष डॉ.भालचंद्र पैके, सहसचिव डॉक्टर सुनिता चवळे, संस्था सदस्य अनिल मुळे, उद्योजिका उर्मिलाताई बिराजदार, मुख्याध्यापक गजानन शिंदे, सत्कारमूर्ती रामलिंग तत्तापुरे, सौ.आशा तत्तापुरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी प.पू. गुरुराज स्वामी महाराज म्हणाले की, सरांचे कार्य शैक्षणिक कार्यासोबत त्यांनी सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात मोठे योग दान दिल्याचे सांगितले.
या समयी खासदार शिवाजीराव काळगे, आमदार विक्रम काळे, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील, नगराध्यक्ष एडवोकेट स्वप्नील व्हत्ते, डॉ सुनिताताई चवळे-लोहारे यांच्यासह सत्कारमूर्ती रामलिंग तत्तापुरे यांचे मनोगतवर भाषणे झाली.
यावेळी त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक,सांस्कृतिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मोठ्या योगदानाबद्दल माजी विद्यार्थ्यांच्यावतीने सरांचा बीज तुला करून त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार, सन्मानपत्र आणि कॅनवास देऊन माजी विद्यार्थी आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविक विलास बडे यांनी सूत्रसंचालन प्रा. मारुती बुद्रुक पाटील व कपिल बिराजदार यांनी केले तर आभार आशा रोडगे – तत्तापूरे यांनी मानले.
कार्यक्रमाचा शुभारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षाला पाणी घालून करण्यात आला.
या सोहळ्याला शि भ प भगवंतराव पाटील चांबर्गेकर, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, जी प सदस्य सर्व श्री अडवोकेट अजिंक्य देशमुख, प्रफुल्लचंद गुंडरे, अश्विन नागराळे, विठ्ठल माकणे, गोविंदराव माकणे, ॲड भगवानराव पौळ शिवाजीराव जगापल्ले सोबतच पंचायत समिती सदस्य, नगरपरिषद सदस्य, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, शिक्षक, शेतकरी बांधव, महिलावर्ग आणि शिक्षण प्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुशील घोटे, राम गंगथडे, मयूर शेटकार, महेश ढाकणे, ओम पुणे, राजू कल्याणे, अनिल कासनाळे, सतीश लोहारे, विनोद हिंगणे यांच्यासह माजी विद्यार्थी संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.



