केपीएल सीजन ३ : प्रतिष्ठेची लढत रंगणार!

लातूर | केपीएलच्या तिसऱ्या हंगामात रंगतदार घडामोडी घडण्याची चिन्हे दिसत आहेत. यंदा एमएसके व एक्टिव्ह ११ या दोन संघांभोवती चर्चेचे वादळ उठले असून, या चर्चेचे कारणही तितकेच महत्वाचे आहे.


गेल्या दोन हंगामात एमएसके संघाचे नेतृत्व मयूर राजापुरे यांनी केले होते. मात्र यंदा संघाचे मालक लक्ष्मण सूरवसे यांनी मयूरला कर्णधारपदावरून दूर करून सोनू डगवाले यांच्यावर विश्वास दाखवला आहे. मयूरला डावलण्याचे कारण स्पष्ट नसले तरी मागील एका सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनातून दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. परिणामी मयूर आता एक्टिव्ह ११ संघाचा खेळाडू म्हणून मैदानात उतरणार आहे.
मयूरच्या खेळात आणि संघातील सक्रिय सहभागातून त्याने ही गोष्ट मनावर घेतल्याचे स्पष्ट दिसून येते. दुसरीकडे, सोनू डगवाले यांना कर्णधार म्हणून संघाला अंतिम फेरीत नेण्यात अद्याप यश आलेले नाही. यंदा संघ मालकाने दाखवलेला विश्वास ते सार्थ ठरवतील का, आणि एमएसकेला लागलेले उपांत्य फेरीतील पराभवाचे ग्रहण दूर करतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संघ मालकाची मनस्वी इच्छा किमान मयूरच्या संघाला हरवण्याची तरी पूर्ण होईल का, हा देखील एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे या दोन्ही दिग्गज खेळाडूंची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.
जर एमएसके आणि एक्टिव्ह ११ आमनेसामने आले, तर ही लढत नक्कीच बघण्याजोगी ठरेल यात शंका नाही.
देव करो हे दोन्ही संघ एका गटात येऊ नयेत!




Active plus 11 winer honar