विचारशलाकाने समाजाच्या वैचारीक गरजांची पूर्तता केली-प्रा इंद्रजित भालेराव

लातूर:समाजाला विशिष्ट दिशेने विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून आणि वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या वैचारिक गरजा पूर्ण करण्याचे काम डॉ. नागोराव कुंभार सर हे मागच्या चार दशकापासून विचारशलाकाच्या माध्यमातून करत आहेत असे विचार महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक कवी प्रा. इंद्रजीत भालेराव यांनी व्यक्त केले,ते विचारशालाकाच्या संत तुकाराम आणि संत कबीर यांचे विचारविश्विव या विशेषांकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते.
विचारशलाकाच्या चार दशकपूर्ती निमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या संत तुकाराम आणि संत कबीर विचारविश्व या विशेषांकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते अध्यक्षस्थानी संपादक माजी प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार होते.तर प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ कवी प्रा.फ.म.शहाजिंदे, प्रा. गांविंद घार, डॉ जयद्रथ जाधव, माजी प्राचार्य सोमनाथ रोडे व इतर मान्यावर होते.
पुढे बोलतांना त्यांनी डॉ नोगोराव कुंभार सर हे वैचारिक विश्वातील ओयॅससि असून ते लातूर सारख्या ग्रामीण भागातून सामाजिक चळवळीसांठीचे आणि बौध्दीकमार्गदर्शन करत असल्याचे सांगीतले. यावेळी प्रा फ म शहाजिंदे यांनी संत तुकारामांनी जशी धार्मिकतेतील नैतिकता महत्वाची मानली तसे डॉ कुंभार यांनी वैचारीकतेतील नैतिकता पाळून सामाजाताच्या वैचारीक गरजांची पूर्तता ते गत चाळीस वर्षापासून भगवत असल्याचे गौरोउद्गार त्यांनी काढले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानांवरुन बोलतांना माजी प्राचार्य तथा संपादक डॉ नागोराव कुभांर यांनी संतानी जशी समाजाला मूल्याधिष्ठीत विचार प्रादन केला ज्यामुळे सामान्यांचे जगणे सुसाह्य झाले, बहुजनांचे आधार दिला ,त्यांचया संघर्ष केला,सामान्यांचे दु:ख दूर करण्याचे संतानी केले. सत्याची मांडणी ही निर्भयपणे होणे अपेक्षित असून संत कबीर आणि संत तुकारामांनी सामान्यांना निराशावादाच्या गर्तेतून बाहेर पडून जगण्याचे बळ दिले असे विचार मांडले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा डॉ विभूते राजेश यांनी केले तर डॉ अनिल जायभाये यांनी विचार शलाकाच्या चार दशकाच्या वाटचालीवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा रणजित जाधव यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.



