नवोदय विद्यालय 9 आणि 11वी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्जासाठी मुदतवाढ

नवोदय विद्यालय समितीमार्फत शैक्षणिक वर्ष २०२७-२८ साठी इयत्ता नववी आणि अकरावीमधील रिक्त जागांवर प्रवेशासाठी 15 ऑक्टोबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे पूर्वी ही मुदत 30 सप्टेंबर 2026 पर्यंत होती .
लॅटरल एंट्री सिलेक्शन टेस्ट -२०२७ साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी विनामूल्य ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. इयत्ता नववी व इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी स्वतंत्र ऑनलाइन नोंदणी पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ ऑक्टोबर २०२६ आहे.
इयत्ता नववीसाठी जे विद्यार्थी सध्या आठवी मध्ये शिकत आहेत ते विद्यार्थी नववी प्रवेशासाठी अर्ज करू शकतात त्याने खालील लिंक वर इयत्ता नववीच्या प्रवेशासाठी नोंदणी करावी👇👇👇 https://cbseitms.nic.in/2026/nvsix_9
आणि जे विद्यार्थी सध्या दहावी मध्ये शिक्षण घेत आहेत ते विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी खाली लिंक वर अर्ज करू अर्ज करू शकतात👇👇👇👇 https://cbseitms.nic.in/2026/nvsxi_11 या पोर्टलवर नोंदणी करावी. प्रवेशासाठी आवश्यक असणारी पात्रता, नियम व इतर विस्तृत माहिती असलेले माहितीपत्रक ऑनलाईन नोंदणी पोर्टलवर उपलब्ध आहे. सर्व पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी आपला ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



