लातूर पॅटर्न

राजर्षी शाहू ची स्क्रीनिंग टेस्ट 23 मार्चला

एम्स आणि आयआयटी बॅचेस साठी नोंदणी सुरू

लातूर – राजश्री शाहू कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील अकरावीसाठीच्या एम्स आणि आयआयटी बॅचेस साठी दिनांक 23 मार्च 2025 रोजी स्क्रीनिंग टेस्ट घेतली जाणार आहे. या टेस्ट साठी दहावी मध्ये शिकत असलेला कोणताही विद्यार्थी पात्र आहे. त्यासाठी त्याने कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करणे अनिवार्य असणार आहे. नोंदणी करण्यासाठी कोणतेही कागदपत्र अपलोड करावयाचे नाहीत. आधार कार्ड, आणि इतर संबंधित माहिती भरून दोनशे रुपये नोंदणी शुल्क भरावे लागणार आहे.
2017 पासून राजर्षी शाहू महाविद्यालयात इयत्ता अकरावी साठी एम्स आणि आयआयटी या शाखेत शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांकरता स्पेशल बॅचेस निवडल्या जातात. यासाठी एम्स मेडिकल साठी 240 विद्यार्थ्यांच्या दोन तुकड्या तर आयआयटी साठी ची 120 विद्यार्थ्यांची एक तुकडी या स्क्रीनिंग टेस्ट च्या माध्यमातून निवडली जाते. या दोन्हीही स्पेशल बॅचेस च्या माध्यमातून अनेक गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांनी देशभरातील एम्स आणि आयआयटीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश मिळवला आहे.
2024 मध्ये घेण्यात आलेल्या स्क्रीनिंग टेस्टला राज्यभरातून 14 हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. 2025 ते 27 या बॅचसाठी(11,12 वी) 23 मार्च 2025 रोजी स्क्रीन टेस्ट घेतली जाणार आहे.
यासाठी पीसीबी (एम्स) आणि पीसीएम (आयआयटी) असे दोन ग्रुप पाडून ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम आणि त्याची संपूर्ण माहिती पीडीएफ मध्ये देण्यात आलेली आहे. शिवाय स्क्रीनिंग टेस्ट संदर्भातील सर्व माहिती महाविद्यालयाच्या वेबसाईटवर देखील उपलब्ध आहे.
आय आय टी टेस्टसाठीचा अभ्यासक्रम 👇PDF
PCM Syllabus
स्क्रीनिंग टेस्ट संदर्भातील माहिती पत्र 👇PDF
Information
एम्स स्क्रीनिंग टेस्ट संदर्भातील अभ्यासक्रम👇PDF
PCB Syllabus (1)

16 Comments

  1. How can I fill the screening form and please inform the last date of registration of screening test

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/