
गात जावे जीवन गाणे
तीळ गूळ घ्या
तीळ गूळ दया
गोड गोड बोला
जिंदगीभर पाला
तीळ गुळाच गुण
गाती सदा सर्वजण
जपा निष्ठा नीती
कधीच नसेल भीती
करून गुण आत्मसात
टिकावावे अतूट नातं
कशाला मनी भेद?
नसावा कोणासंग वाद
वर्षातला एक दिवस
दर वर्षीचं येत असतो
करून साजरा सण
विसरून जात असतो
ध्यानी मनी असावे रोज
कमवावा पैसा की नाव
नित्य कर्मसेवा करावी
माणसाचाही होतो देव
नाथा नागनाथसा वाटे
एकमेकांचे जपावे मने
सण येतील जातील
गात जावे जीवन गाणे
इंजि. नागनाथ कलवले
लातूर




