
कर्मकांड विरहित कर्मठ सनातनी च्या विरोधात जाऊन समाजाला बुद्धीप्रामाण्यवादाची शिकवण देत समाजातून जात-पात नष्ट करण्याचा प्रयत्न करणारे एक महान संत श्री मन्मथ स्वामी यांच्या जयंतीनिमित्त हा अज्ञात लेखकाने लिहिलेला लेख. माऊलींच्या विचारावर चालणारा मोठा परिवार मराठवाड्यासह कर्नाटकात आहे त्यांच्यासाठी
बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा परिसरात असणाऱ्या डोंगररांगातील कपिलधार येथे समाधीस्थ असलेले श्री मन्मथ माऊली.
संत शिरोमणी मन्मथ स्वामी ! अर्थातच मन्मथ माऊली !!
मन्मथ माऊली म्हणजे महाराष्ट्रातील लिंगायतांची अस्मिता ! माय मराठीच्या सारस्वताचा अलंकारच !
मन्मथ माऊली म्हणजे एक विद्रोही व्यक्तिमत्त्व ! मानवी जीवनाला केंद्र स्थानी ठेवून त्याला सर्वप्रकारच्या गुलामगीरीतून मुक्त करणारे स्वातंत्र्याचे उद्गाते ! मन्मथ माऊलींनी आपल्या साहित्यातून सामाजिक समतेचा व सामाजिक भक्तीचा संदेश दिला. कर्मकांड, अस्पृश्यता आणि अंधश्रद्धा संपवून एका नव्या बुद्धिप्रामाण्यवादी समाज रचनेचा त्यांनी आग्रह धरला.
मन्मथ स्वामी हे बंडखोर व्यक्तीमत्व आहे. जातिअंताच्या लढाईचे सेनापती होते. सनातनी कर्मठ धर्ममार्तंड व धर्मांध मुस्लिम शासकांच्या अत्याचारात खितपत पडलेल्या लिंगायत समाजाला त्यांनी मुक्त करण्याचा खूप मोठा प्रयत्न केला. निद्रिस्त व भयग्रस्त झालेल्या समाजाला जागे केले. आपल्या खांद्यावर भगव्या ध्वजाची पताका घेऊन त्यांनी महाराष्ट्र देशी मुक्त संचार केला.
निजू नका जागा जागा । आपल्या स्वधर्माने वागा ।।
हा दिव्य संदेश देऊन शिवकिर्तन व भजन परंपरा या मातीत रुजवली. संस्कृत ग्रंथात व टोलेजंग मठात बंदिस्त झालेल्या लिंगायत धर्माला त्यांनी लोकजीवनात आणले. प्राचीन शिवसंस्कृतीचा व बाराव्या शतकातील बसवादी शरणांच्या वचन साहित्याचा अमृतकुंभ मराठी भाषेत रुपांतरीत केला आणि महाराष्ट्रातील लिंगायतांना चिरंजीव केले. अशा महान क्रांतिकारी संत शिरोमणी मन्मथ स्वामींची आज जयंती आहे.
या पवित्र आणि मंगलमय दिनी मन्मथ माऊलींच्या त्यागाचे व विद्रोहाचे स्मरण करु या !
शरणु शरणार्थी !
लेखक अज्ञात




It’s very honourable that someone has proud on facts of lingaytism.Actually Manmath Swami transfred Basvsnnas and sharana s vachan s in Marathi….abhang….it’s very important that ,he kept name…param rahasya…..logic behind was that upto १९ th century no one knows kannada bacchan sahitya except maths……which was kept away in fear of सनातन crowd ,peoples…..I think Manmath Swami got it from manur math…..and they transfred in Marathi abhang…..
Thank you first for your valuable feedback, I know very well about Swamiji and his work, I belongs to lingayat, Sence my childhood I reed every year paramrhsya, thanks once again