आम्ही असहिष्णू बनत आहोत का?
भारतीय समाजातील स्थित्यंतरे ही नेहमीच विकासोन्मुख स्थितीकडे घेऊन जाणारे ठरले आहेत. त्यामुळे समाजात निर्माण होणाऱ्या नवीन प्रतीकांचा समाजाने नेहमीच स्वीकार केलेला आहे. पण अलीकडे समाजातल्या प्रत्येक घटकाला प्रभावी करणाऱ्या राजकारणाने सामाजिक सहिष्णुता संपुष्टात आणली आहे की काय, अशी शंका मनाला चाटून जाते यासंदर्भात श्री किशोर महाजन यांना आलेल्या विविध घटना आणि प्रसंगाच्या अनुभवातून त्यांनी केलेलं हे मार्मिक विवेचन संपादक
गेल्या महिन्या भरात काही घटना अशा अनुभवल्या ज्या सध्याच्या बदलत्या सामाजिक परिस्थिती कडे उंगली निर्देश करणाऱ्या वाटल्या…..
प्रसंग-1– देवर्शनाला जाण्यासाठी गाडी ठरविण्यासाठी नेहमी प्रमाणे ओळखीच्या ड्रायव्हर ला फोन केला आणि संवाद—-
मी-: एखादी गाडी आठ सीट ची ठरव, माहूरला जायचय
ड्रायव्हर-: गाडी आहे पण तुम्हाला चालल का ?मुसलमान ड्रायव्हर आहे
मी -: का नाही चालणार तू कोण हे माहीत असूनही तुला माझ्या माजघरापर्यंत प्रवेश आहे ना?
ड्रायव्हर -: आपलं वेगळ आहे साहेब सध्या वातावरण वेगळ आहे म्हणून म्हटल
मी-: वेगळ बिगळ काही नाही त्या ड्रायव्हर ला कामास काम ठेउन ड्रायव्हिंग करायला सांग बस्स
नेमक त्या दिवशी विधान सभेची मत मोजणी होती आणि महायुती जिंकत होती मी हेडफोन लाउन निकाल ऐकत होतो .ड्रायव्हर ने विचारल्यावर महायुती जिंकत असल्याच सांगत होतो. परंतु त्याच समाधान झालेल दिसत नव्हत .त्याने चहापाना साठी गाडी थांबवुन फोना फोनी केली , ती मी ऐकली, संभाजी नगर ,नांदेड,मालेगांव इत्यादी एम आय एम च्या जागांची माहिती घेत होता गैर काहीच नव्हत तो मला थेट विचारू शकत होता. परंतु बदललेल्या सामाजिक वातावरणाचा परिणाम होता. चुक ड्रायव्हर ची नाही परिणाम बदललेल्या सामाजिक वातावरणाचा आहे.दोन दिवस ड्रायव्हर म्हणुन त्याच काम चोख केल हे सांगायला हवं.
प्रसंग-2 – पनवेलहून लोकल ने वडाळा रोड ला गेलो आणि भायखल्याला राणीच्या बागेत जाण्यासाठी टॅक्सी त बसलो .ड्रायव्हर साठ एक वर्षाचा मुस्लीम होता——
मी-: “मोबाईल से गुगल पे से पेमेंट ले सकते हो?”
ड्रायव्हर-: “नही साब ,बँक मे रखने इतने पैसे कहा कमाता हॅू. अकेला कमाता हॅू. दस लोग खानेवाले है.ये हुकुमत ऐसी आई है मंहगाई, बेरोजगारी भ्रष्टाचार इत्यादी इत्यादी… पाच सात मिनीट बडबडत होता मी डोळे मिटुन शांतपणे ऐकत होतो शेवटी जेव्हा तो म्हणाला की “ लोगोंकी आझादी छिनी जा रही है. किसी चिज की आझादी नही लोगोंको”
मी-: डोळे उघडुन त्याच्याकडे रोखुन पाहात विचारल “मसलन ,दो बाते बता सकते हो “
यावर तो गडबडला आणि आप क्या काम करते है साब
मी-: पेन्शनर हूँ
ड्रायव्हर-: पुलिस मे थे
मी -: हा ,क्यॅू ?
ड्रायव्हर-: कितने स्टार के अफसर थे दो या तीन
मी -: तीन
त्यानंतर त्याची बडबड तर बंद झालीच पण भाषाही बदलली .मेरे दोस्त के मोबाईल मे पैसे डालके पेमेंट ले लेंगे पर्यत तयार दर्शवली.
प्रसंग-3 – दादर ला महिला वर्गाच शॉपींग चालु होत. एका गाड्यावर कपडे खरेदी झाली अन पैसे देताना पत्नीची पर्स शिवाजी मंदीर मधील मॅजेस्टिक बुक स्टॉल च्या बाकावर विसरल्याचे लक्षात आले. आपण जाउन पर्स पाहू यात अस मी म्हणालो आणि कपडे विक्रेती महिला देखील म्हणाली “जलदी जाव ,मै कपडे पॅक करके रखती हॅू “ आम्ही धावत पळत गेलो तर पर्स बाकड्यावरच होती. पुन्हा कपडे विक्रेतीकडे आलो आणि पैसे दिले. ती आम्हाला कपडे देउ लागली .तेव्हा कपडे तिने आधीच कपडे दिल्याच आम्ही तिच्या लक्षात आणून दिलं.
तेव्हा ती म्हणाली “आपकी पर्स क्यु मीली मालुम है ?“ मला वाटल की आम्ही प्रामाणिकपणा दाखवत कपडे दोनदा तिच्या कडूनं घेतले नाहीत. असं काही तरी म्हणेल पण तिन दिलेल उत्तर धक्कादायक होत, म्हणाली “मै मुस्लिम हॅू .तुम पर्स धुंडने को गये तब, मैने तुम्हारे लिये कुराण की आयाते पढकर दुवा मांगी. इसलिये अल्लातालाने रहम किया” कुराण सबने पढना चाहिये .तिने दुवा मागीतली इथ पर्यंत ठिक आहे परंतु “कुराण सबने पढना चाहिये” हे तिच शेवटच वाक्य बदलत्या सामाजिक परिस्थिती कडे माझं लक्ष वेधणारं होत.
वरील तिन्ही प्रसंग हातावर पोट असणाऱ्या कष्टकरी वर्गाचे आहेत.अशाच प्रतिक्रिया हिंदुंच्या सुध्दा आहेत हे महायुतीच्या महाविजयाने दाखउन दिलं आहे. त्यामुळे वेगळे प्रसंग सांगायची आवशकता नाही.मुद्दा एवढाच आहे की,इस्लाम खतरे मे– किंवा धर्मो रक्षति रक्षित: हा नरेटीव्ह राजकिय न राहता समाजाच्या तळापर्यंत पोहचला आहे. त्यामुळे त्याचे सामाजिक परिणाम दिसणं अपरिहार्य आहे.
हिंदू मुस्लीम प्रश्न तसा भारतासाठी नवा नाही परंतु आता या प्रश्नावर ध्रुविकरण करून उजव्यांनी सत्ताहस्तगत करून दाखवली आहे. त्यामुळे हा प्रश्न सामाजिक न राहाता राजकिय बनला आहे.या प्रश्नावर डावे उजवे दोघेही सारखेच. तें फक्त मतांच गणित घालतात.यात कोण चुक कोण बरोबर या चर्चेला अंत नाही .दोन्ही कडेही मुद्दे आहेत ते सोशील मीडीयावर आपण वाचताच त्या चर्चेत मला पडायचेही नाही. सध्यातरी डाव्यांच्या फसव्या धर्मनिरपेक्षतेला कंटाळुन जनतेने उजव्यांच्या हिंदुत्वाला निवडल आहे.परंतु पत्रकारितेचा विद्यार्थी म्हणुन व्हाटस नेक्स्ट / पुढे काय हा प्रश्न पडतोच .लेख फारच लांबतोय पडलेले प्रश्न पुढच्या लेखात लिहीन .हो फक्त प्रश्नच कारण विज्ञान शाखे सारखे निश्चित निष्कर्ष सामाजिक शास्त्रात काढता येत नाहीत फक्त अंदाज वर्तवु शकतो एवढच.
उजवे असो वा डावे ते भारतिय समाजाला नेमक्या कोणत्या मुक्कामावर घेउन जाउ पहात आहेत हे त्यांना तरी माहिती आहे का. कुणीतरी एका बाजूने समन्वयाची भूमीका घेतल्या शिवाय यातून तोडगा निघणार नाही
स्वातंत्र्य समराच्या मंथनातून फाळणीचं हलाहल निघालं ते आपण पचवले स्वातंत्र्याच्या अमृत वाटणीतील असमानते बाबत अजून चर्चा चालूच आहे आता डाव्या उजव्यांनी नव्याने समाज समुद्राचे मंथन सुरू केलं आहे यातून फक्त हलाहल च निघेल अमृत निघणार च नाही असं ठाम पणे म्हणता येणार नाही विज्ञान शाखे प्रमाणे सामाजिक शास्त्रांसारखे ठाम निष्कर्ष काढता येत नसले तरी शक्यता वर्तवल्या जाऊ शकतात त्या सत्याच्या जवळपास असतात त्यामुळे इथं फार अहमीकतेने ठाम होऊन टीका करून उपयोग नसतो आणि गोडवे गाऊन ही उपयोग नसतो समाज हिता साठी संतुलित विचार करून पत्रकारितेचा विद्यार्थी म्हणून लिहायला हवं याची जाणीव ठेवून लिहीत आहे
कारण दोन समाजात सौहदार्य कसे निर्माण होईल या विषयी कुणीच प्रयत्न करताना दिसत नाही सन 2023 मध्ये सरसंघचालकांच्या भारतीय मुस्लिम और हमारा डी एनए एक है आणि ज्ञानवापी सर्व्हेक्षणास सरसंघचालकांनी विरोध दर्शविला होता मोदीही सुफी धर्मगुरुंना भेटत होते. योगी ही मदरसा सुधारण करीत होते. 2024 च्या लोकसभा निकाला नंतर हे सर्व बंद पडायला लागल. पुन्हा प्रखर हिंदुत्वाचा स्वीकार होताना दिसतो आहे. पण या गणित सोडवण्याच्या पध्दतीचा शेवट काय होणार आहे याचा विचार केला आहे का याच उत्तर कुणाकडेच नाही फक्त संभावना सांगता येतील

लेखक श्री किशोर महाजन (सेवानिवृत्त अभियंता)




‘आम्ही असंहिष्णु बनत आहोत का?’ वाचनिय लेख.धन्यवाद!
लिखाण आणि सदोहारण लिहिलेला लेख उत्तम आहेच. आपल्या पत्रकारितेच्या पार्श्वभूमीवर कोणतेही मत न नोंदवता निष्कर्ष वाचकांवर सोडणे ह्या मुळे लेख अव्वल दर्जा घेतो आहे. आजच्या तथाकथित विकाऊ, विकेबल असणाऱ्या पत्रिजारांनी हा लेख आवर्जून वाचावा.
दुसरे आजचा majority समाज reactionery आहे. ज्या दिवशी तो proactive होईल आणि preemptive पावलं उचलायला लागेल त्या दिवशी आजची असहिष्णुता संपेल हे अंतिम सत्य असेल.
खूप खूप धन्यवाद सर आपल्या सारख्या चोखंदळ वाचकांसाठी हा खटाटोप