FLash
सर्वोदय मंडळ, चंद्रपूर येथे नवीन कार्यकारी मंडळ

चंद्रपूर येथे कार्यकारी मंडळाची बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीमध्ये संस्थेच्या आगामी सामाजिक कार्याचे नियोजन व विविध उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी नवीन कार्यकारी मंडळाची नियुक्ती करण्यात आली असून अध्यक्षपदी ईश्वरजी गहुकर यांची निवड करण्यात आली.
महात्मा गांधी यांच्या सर्वोदय विचारांवर आधारित ग्रामविकास, सामाजिक समता, स्वावलंबन, शिक्षण, आरोग्य व जनजागृतीच्या माध्यमातून समाजहिताचे कार्य अधिक प्रभावीपणे करण्याबाबत चर्चा झाली. युवक, महिला व सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात आला.
नवीन कार्यकारी मंडळाने एकजुटीने व सामाजिक बांधिलकीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. अध्यक्ष ईश्वरजी गहुकर यांनी सर्वांच्या सहकार्याने सर्वोदय मंडळाचे कार्य अधिक व्यापक करण्याचा विश्वास व्यक्त केला.



