Third Eye

प्रत्येक पिढीला भाषेच्या सरणावर संस्कृतीचे प्रेत पेटवावे लागते?

Sunday Special

भाषेचा अभिमान तर सर्वांनाच असतो. भाषा ही संस्कृतीची वाहक असते आणि भाषा आणि संस्कृतीचा अनन्य संबंध समाजात सर्वत्र वावरताना दिसत असतो. अशाच या भाषेबद्दल अतिशय मार्मिक पण भेदक असं विवेचन केला आहे ज्येष्ठ पत्रकार शिवाजी राऊत यांनी.खास आपल्यासाठी,या लेखाबद्दल आपणास काय वाटते प्रतिक्रिया निश्चित द्या.

कोणताही भाषिक भाषा खातो .भाषा पितो .भाषेवर नाचतो. भाषा वापरतो भाषा वाकवतो. भाषा झुकवतो भाषा नमवतो. भाषा गमवतो . भाषेच्या साह्याने इतरांना पराभूत करतो. व स्वतः भाषा विजयी बनतो हा भाषेच्या राजकारणाचा व्यवहार वाद मराठी मध्ये एका विशिष्ट वर्गालाच कळतो ? असे धाडसाने नमूद करणे हे योग्य होणार नाही .तमाम मराठी भाषिकांच्या जीवन विश्वात भाषेचे राजकीय अंतरंग कितपत कळतात हाच खरा प्रश्न आहे . ? हे गभीर पने समजावून घेतले.जात नाही.

मराठी भाषिक आणि भाषा राजकारण याचा अनन्य संबंध सर्व कालखंडातला अभ्यास करून म्हणूनच तो पुढे मांडला गेला पाहिजे आपली संवाद भाषा मौखिक भाषा प्रतिक्रियेची भाषा भाषा आक्रमणामुळे स्वीकारलेले शब्द आणि त्या शब्दांचे आपल्या मनावरील प्रभुत्व या आधारे भाषिकडे पाहायला हवे आहे.भाषा इतिहास लादते भाषा श्रद्धा लादते भाषा श्रेष्ठत्व जपते भाषा शरणत्व शूद्रत्व स्वीकारण्यास भाग पाडते ही भाषेचा इतिहास आणि राजकारणातील भूमिका आता खूप स्फोटक होऊ लागली आहे. मराठी भाषेच्या उर्जित काळाच्या कथा खूप आहेत पण त्या कोणत्याच काळात मराठीचे अन्य भाषांच्या वरील आक्रमण भाषेचे अभिसरण भाषेचे प्रभुत्व भाषा समृद्धीचे विकसित झालेले स्वरूप याबद्दल खुद्द मराठी भाषिकांनाच कितपत आकलन आहे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आम्हा भाषिकांच्या मर्यादा हीच आमच्या मराठी भाषेच्या दारिद्र्याचे कारण आहे ऐतिहासिक भाषा धार्मिक भाषा, श्रद्धा अंधश्रद्धा प्रसूत करणारी भाषा, रूढी परंपरांना कवटाळून व्यवहार करणारी मराठी भाषा शेती कृषी क्षेत्राशी निगडित भाषा, वर्णव्यवस्थेतील प्रभुत्व वर्गाशी संवाद करताना वापरली जाणारी आपसूक शरणभाषा ,असा सगळा भाषेचा प्रदेश व्याप्त व्यक्ती जीवनाला झालेला असतो. .

भाषेच्या सुद्धा पिढ्या असतात भाषा संक्रमणाचा, बदलाचा कालखंड असतो. पण भाषेच्या एकूण इतिहास कालखंडापासून वर्तमानात हे होणारे बदल तात्काळ कळत नाहीत. म्हणून तर भारतीय राजकीय क्षितिजावर gen z च्या पिढीने जो भाषिक अविष्कार घडवला आहे. त्यामुळे इथल्या प्रभुत्व भाषा मुखंडांचे अहंकार दुखावले गेले आहेत. भाषेची अभद्रता, भाषेची मोडतोड भाषेचा स्वैरवापर आणि एकूणच आशय आकलन नसलेली भाषा बेधडक भाषा वापर करण्याची धैर्यवृत्ति नव्या काल्पनिक शब्दांचे उपयोजन आणि विद्रोह नकार बंड ,बदनामी यासाठी भाषा वाकवण्याचे नव्या पिढीचे सामर्थ्य अफलातून आहे . हीसंक्षेपाची ही भाषा आहे.
हा सगळा भाषिक बदलाचा प्रदेश नीट समजावून घेतला पाहिजे प्रत्येक पिढी चे भाषिक संस्कार आकलन उच्चार वापर आणि आशय पोहोचवण्याचा वेग हे वेगवेगळ्या असतात याचाच प्रस्तुत एक दशकात झालेले बदल हे कोणत्या कारणामुळे झाले आहेत.

भाषिक बदल शिक्षण राजकारण धर्म संस्कृती अर्थकारण हे अनेक घटक कारणीभूत असतात . या सगळ्या क्षेत्रांचा खोलात जाऊन पिढ्यांच्या मानसिकतेत आकलनात भाषिक उच्चारत जो बदल झालेला आहे तो समजावून घेणे खूप महत्त्वाचे आहे
शुद्ध व्याकरणाधिष्ठित आणि विश्लेषणकारी प्रदीर्घ भाषा याचा 80 ते 90 च्या दशकातला वापर हा कमी कमी होत जाऊन संक्षिप्त भाषा आशय पोहोचवणारी भाषा अभिजन शब्दांच्या पलीकडे बोलीभाषेतील परिचित शब्दांचा वापर करून भाषिक व्यवहार पूर्ण करण्याकडे नव्या पिढीचा कल जास्त वाढू लागला आहे हे 90 च्या दशकानंतर खूप वेगाने पुढे चालले आहे 90 च्या दशकापर्यंत भाषिक संस्काराची शुद्ध आ शुद्धतेची असे पूर्णतेचा सर्व क्षेत्रातला आग्रह होता आणि त्या अनुरूप स्वीकार करून वर्तन करणारे आज्ञाधारक शिक्षण क्षेत्रातील पिढी होती 90 उत्तर कालखंडात हे सगळे 2010 पर्यंतचे वातावरण नागरी भाषेतील प्रमाण भाषेतील शब्दांचे उच्चाराचा आणि वापराचा आटोकट प्रयत्न करणारा भाषिक घटक शहरी ग्रामीण भागात आढळून येत होता तो शुद्ध अशुद्धतेच्या अपराधातून स्वतःला मुक्त करत अभिव्यक्त होत होता आणि त्यातूनच मराठीच्या अभिव्यक्तीचा साहित्य क्षेत्रातील वेग वाढला आणि मराठी साहित्यात कवितेचे पेव फुटले मात्र समीक्षा ललित तत्व पर लेखन अभावानेच ग्रामीण साहित्यातून पुढे आलेली दिसून येते वृत्तपत्रे भाषेच्या संस्कारातून आणि विद्यापीठीय भाषेच्या प्रभुत्वातून मराठी भाषेची मुक्तता नवपिढ्यांनी स्वतःहूनच करून घेतले आणि या कालखंडातील शहरी महानगरीय विद्यापीठीय लेखन करणारा वर्ग भाषेच्या स्वयं महात्म्यात स्वरंजनात आत्मगौरवात राहिला आणि त्याच कालखंडामध्ये नवपिढ्यांनी या आत्मवृत्त भाषा प्रेमिका नागरी वृत्तपत्रीय लेखनकर्त्या ना बाजूला ठेवले हे महाराष्ट्रात घडले आहे. नवा लिहिता वर्ग त्यांची ऊर्जा त्यांचे आकलन त्यांचे भाषा विश्व याकडे तुच्छतेने महानगरीय मराठी लेखकांनी विद्यापीठ शिक्षकांनी पाहिल्यामुळे या सगळ्या अपराधी भावना जपत (दलित साहित्य विद्रोह वगळता) नव्या पिढीचा भाषिक विद्रोह 2010 नंतर जास्त वेगाने होऊ लागला असे म्हटले तर ते चूक ठरत नाही.

भाषेचे महात्म्यं भाषेचे प्रभुत्व प्राप्त करण्यासाठी भाषिक संस्कार वाचन लेखन सतत नवं विषयाचे विश्लेषण करण्याची दक्षता (क्षमता प्राप्ती )ग्रामीण भागातील नव्हे तर तमाम मराठी भाषिकांनी घेतली नाही आणि त्यामुळेच समृद्ध भाषेच्या संस्कारापासून भाषिक संप्रेषण भाषिक राजकारण भाषिक इतिहास मानवीअन्वेषण अध्यात्मिक भाषेच्या वापरातून सणतनाध्यात्मिक विचार पुढे नेण्याची कपटनीती हा सगळा भाग मराठी भाषिकांच्या नव्हे तर सर्वच भाषिकांच्या नवसाक्षर पिढ्यांच्या अज्ञानातून पुढे जात राहिला आणि त्यामुळे हे सगळे ओझे त्यातले कपट राजकारण करण्यासाठी नऊ फाशीवादाचे नव हिंदुत्ववादी केंद्र सरकार जेव्हा सत्तेत आले तेव्हा या सर्व भाषिक राजकारणाच्या कपटनीती बदनामीच्या षड्यंत्राच्या पद्धती मराठी भाषिक करणार आहे. तर सर्वच भाषिकांना कळू लागले आणि त्यातूनच भाषिक विद्रोह भाषिक बंडखोरी भाषिक विखंडन वाद हा पुढे आला त्यातूनच शब्दांचे नव निर्माण प्रदेश तयार होऊ लागले यातील शब्द बेधडक आहेत नैतिकता सभ्यता लैंगिकता शिव्या बदनामी या सगळ्या पलीकडे आविष्काराला खूप महत्त्व आहे हे gen z ने दाखवून दिले.
अन्याय अत्याचार हिंसा शोषण हे सर्व काळात चालू असतात नव्वद उत्तर कालखंडात त्या पिढीला ही हे सगळे आघात सहन करावे लागलेले आहेतच पण या प्रवृत्ती विरुद्ध भाषिक विद्रोहाचा साहित्यिक वर्ग सोडला तर सर्वसामान्य भाषिकांच्या मध्ये विद्रोह भाषेच्या पातळीवर मोठा असंतोष अभिव्यक्त झालेला नाही. तो आपल्या भाषिक संस्काराच्या सभ्यता आपली संस्कृती उघडी पडेल या ब्राह्मणी भयाच्यापोटी आग ओकताना दिसला नाही. याचे मुख्य कारण अभिजनांची प्रभुत्व भाषा ही विद्रोही भाषेला नेहमी रोखत असते. ती तिची सभ्यता दाखवून तिच्यातील असंतोषाच्या उर्मी मारून टाकत असते. हे मराठी भाषेमध्ये सतत केले गेले आहे. वारकरी संप्रदाय वैदिक सुफी संत भक्ती चळवळ सत्यशोधक साहित्य आणि स्वातंत्र्य चळवळ या सगळ्या कालखंडामध्ये हा भाषिक संघर्ष उघड तर सुप्तपणे ही चालू होता तो घडून गेला आहे. आणि यातूनच विद्रोहाच्या वाटा बंदिस्त करण्याचे प्रयत्न अभिजन वाद्यांना यशस्वी करता आलेले आहेत.

ब्रिटिशांनी मुस्लिम राजवटीला नामोहरम करण्यासाठी त्यांच्या राज्यव्यवहारातील अरबी हटवले आर्य पुरोहितांनी( ब्राह्मण व) शूद्र या दोन्ही गटातील व्यक्तींच्या सर्वच सत्ता संपत्तीच्या निर्बंधासाठी संस्कृत हटवली हा सगळा भाषिक संघर्ष शिवशाहीच्या शिवशक भाषेच्या कालखंडापर्यंत असा चालू होता आहे आणि आजही नागरी प्रमाण ग्रामीण भाषा या स्वरूपातला हा संघर्ष तसाच पुढे सुद्धपणे चालू ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे भाषिक राजकारण हे सत्ता राजकारण असते हे शोषण राजकारण असते हे आध्यात्मिक राजकारण असते हे इतिहास या क्षेत्रातील अज्ञात प्रदेश कायम ठेवण्यासाठी भाषेचा वापर असाच केला जातो आणि ही सगळे कपट राजकारण अर्थातच “नेरी टिव्ह” सर्वात जास्त मराठी भाषेत चालते ते मराठी भाषिकांना आजही कळत नाही मराठी भाषेतले नेरीटीव कळत नाही याची कारणे प्रभुत्ववाद्यांच्या मराठी भाषेवर चा प्रभाव त्यांची अधिकार साधने प्रसारमाध्यमे प्रकाशन संस्था आणि त्यांच्याच समीक्षकांच्या मान्यतेचे गट पंथ त्यांचेच असल्यामुळे त्यांचीच विद्यापीठे असल्यामुळे आता अजूनही हा प्रभुत्ववाद भाषिक शरणवादाकडे मोठ्या प्रमाणात यापुढे जाणार आहे ,आणि म्हणून मराठीचे वंशिक आध्यात्मिक सनातनी प्रभुत्व हाच शोषण वाद आणि धर्मवादाची कारणे आहेत हे नव पिढीला मोठ्या प्रमाणात कळू लागल्यामुळे विद्रोहाची त्यांच्या धार तळपती आहे त्यांचे शब्द सर्व प्रकारच्या सभ्यता उध्वस्त करीत इथल्या व्यवहाराला उघडे करत ही भाषा पुढे निघाली आहे या भाषेत चित्र माहित आहे संगीत आहे या भाषेत विनोद आहे या भाषेत हास्य आहे या भाषेत बदनामी आहे या भाषेत इतिहास आहे या भाषेत जागतिक समकालीन संदर्भात आणि ही भाषा संदेश वेगवान पद्धतीने पोहोचवण्यात यशस्वी होते आहे म्हणून gen z ची भाषा याबद्दल अभिजन वाद्यांची नाक मुरडणे चालू आहे कोणतेच संस्कार नाहीत कोणताच अर्थ नाही कोणतीच मानवी मूल्य नाही आई वडील यांचे वय पाहणे नाही अशा नैतिक पोलीसगिरीचा भाषिक प्रयत्न आता पुन्हा नव्याने 2026 मध्ये gen z. च्या दिल्ली स्थित आंदोलन काळात नंतर सुरू झाला आहे उपदेश विचार नैतिकता शिकवणारे वृत्तपत्रीय नीतीकार संपादक आता सारी शिकवनी या नव भाषिक पिढीला लावत आहेत.

बंड ,विद्रोह, क्रांती ,आंदोलने, जन आंदोलने रस्त्यावरची निदर्शने या सर्व मध्ये माणसाचा आक्रोशाच्या सर्वहारांच्या चळवळीत तत्त्वज्ञानाच्या विचारसरणीच्या भाषेचे महत्त्व अनन्यसाधारण असतेच पण त्याहून माणूस पेटवणे माणूस धैर्यवान बनवणे यासाठी त्या पिढीची एक भाषा निर्माण व्हावी लागते. ही भाषा सामूहिक समान आकलन बंड धैर्य परिणामाच्या पलीकडे जाण्याची वृत्ती आणि परिणाम भोगण्यासाठीचे सशक्त मन त्या प्रत्येक पिढी जवळ असावी लागते 2026 मध्ये भारतीय राजकीय प्रदेशात आजउच्च शीक्षित मुली आणि मुले युवक आणि युवती आवाज ज्या आकलनाने आक्रोशाने अभिव्यक्त होत आहेत. हे पाहिल्यानंतर इथे या व्यवस्थेला दीर्घकाळ अभिजनाना स्वतःच्या भाषेच्या आधारे सर्वांना फसवता येत नाही हेच सिध्द झाले आहे.

प्रभू तव्व शोषण कपट आणि निरंतर शरण वाद हा भाषेतूनच पुढे जातो इतके भाषेचे आकलन नवं पिढ्याला होऊ लागले आहे. हा भाषिक क्रांतीचा एक पूर्व टप्पा सर्व भाषेत घडून येत असेल तर भाषा हे राजकारणाचे बदलण्याचे अंतिम हत्यार आहे भाषा हाच धैर्य आहे भाषा हाच एल्गार आहे भाषा हाच विद्रोह व्यवस्थेच्या परिवर्तनाची हाक आहे भाषा हीच ऊर्जा आहे भाषा हाच भेदापलीकडचा समतेचा नवप्रदेश हाकारा आहे असे नव्या पिढीने gen z ने दाखवून दिले आहे . हे कथन करणे म्हणजे नवा भाग नाही परंतु आपल्या स्वयं भाषेच्या वर्तनाकडे उपयोजनाकडे आणि भाषेतील आपल्या राजकीय हेतू कथनाकडे प्रत्येक भाषिकांनी सूक्ष्मपणे निरीक्षणपूर्वक हेतू पूर्वक वर्तन करणे महत्त्वाचे आहे म्हणून भाषेचे स्वयं राजकारण हाच स्वतःच्या भाषेच्या सक्षमीकरणाचा नऊ पिढ्यांनी दाखवून दिलेला मार्ग आहे. अन्यथा सम काळातील नव्यापुढे ची उदासीनतात अस्थिरता आणि चगल वाद अशी केवळ कु विशेषणे वापरून काळाच्या पलीकडचे ज्या पिढीला दिसते आहे त्या पिढीच्या ऊर्जेला आकलनाला सशक्त करणे हे त्या काळात समकाळातील सर्वांचेच कर्तव्य असते. म्हणून भाषिक सत्तेचे मानकरी हे सर्व कालखंडात कोण आहेत? त्यांचे राजकारण काय आहे? हे समजण्यासाठी भाषिक बंडखोरी भाषिक विद्रोह प्रत्येक पिढीने करून भाषेवर नाचते भाषा पिते खाते भाषा जागवते भाषा मारते भाषा नवनिर्माण करते असा एक एक क्षेत्र एक एक विषयात ज्ञान अविष्काराचा धैर्यवान प्रयत्न प्रत्येक पिढीला भाषेच्या अनुषंगाने सर्व क्षेत्रात करता आला पाहिजे त्यासाठी हे भाषा भजन आहे.

शिवाजी राऊत, जेष्ठ पत्रकार 9423032256
सातारा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/