भगवान महावीर: वैश्विक शांतीचे आणि प्रगतीचे दीपस्तंभ

भगवान महावीर: वैश्विक शांती आणि शाश्वत प्रगतीचे दीपस्तंभ
भगवान महावीरांचे विचार हे केवळ एका धर्मापुरते मर्यादित नसून ते मानवी अस्तित्वाचे मूळ आधारस्तंभ आहेत.
ज्याप्रमाणे स्वतःला दुःख आवडत नाही, त्याप्रमाणे इतर कोणत्याही जीवाला दुःख देऊ नका. हीच खरी अहिंसा आणि
हाच खरा विकास आहे.”
अनेकांतवाद: लोकशाही आणि वैचारिक समृद्धीचा आधार होय. अनेकांतवाद (Theory of Manifoldness) हा केवळ धार्मिक सिद्धांत नसून तो आधुनिक लोकशाहीचा आत्मा आहे.
आजच्या “माझंच खरं” (Absolute Truth) या हट्टामुळे जगात युद्धे होत आहेत. महावीरांनी शिकवणी नुसार सत्य हे बहुआयामी असते. जर आपण समोरच्या व्यक्तीचा दृष्टिकोन समजून घेतला (ज्याला ‘स्याद्वाद’ म्हणतात), तर संवाद सुरू होतो आणि संघर्षाचा अंत होतो.
व्यावहारिक भाषेत कॉर्पोरेट क्षेत्रातील ‘Conflict Resolution’ साठी अनेकांतवादाचा वापर केला जाऊ शकतो, जिथे भिन्न मते असलेल्या टीम मेंबर्समध्ये समन्वय साधला जातो.
अपरिग्रह आणि पर्यावरणीय शाश्वतता (Climate Action)
महावीरांचे ‘अपरिग्रह’ (Non-possessiveness) हे तत्त्व आजच्या ‘Global Warming’ च्या काळात सर्वात महत्त्वाचे आहे.
मानवाचा हव्यास आणि विकासात्मक विचारहा (Greed) निसर्गाचा नाशावर आधारित आहे. अपरिग्रह म्हणजे केवळ संपत्तीचा त्याग नव्हे, तर ‘गरज’ आणि ‘हाव’ यातील फरक ओळखणे होय.
शाश्वत विकास (SDGs): युनायटेड नेशन्सच्या ‘Sustainable Consumption and Production’ (Goal 12) मध्ये महावीरांच्या अपरिग्रहाचा थेट संबंध येतो. नैसर्गिक संसाधनांचा किमान वापर हीच खरी मानवी विकासाची मानसिकता असेल तर निसर्गात संतुलन राखण्यात यश मिळेल .
’जियो और जीने दो’: सामाजिक न्यायाचे सूत्र
महावीरांनी केवळ माणसांच्याच नव्हे, तर प्राणी, पक्षी आणि वनस्पतींच्या जीवनाचाही सन्मान करायला शिकवते .
महिला सक्षमीकरणासाठी त्या काळात महावीरांनी महिलांना संघात प्रवेश देऊन आध्यात्मिक समानतेचा पाया रचला. आजच्या काळात ‘लिंग समानता’ (Gender Equality) साध्य करण्यासाठी हा विचार आवश्यक वाटतो.
आर्थिक न्याय: जैन तत्त्वज्ञानातील ‘दान’ ही संकल्पना संपत्तीचे विकेंद्रीकरण (Wealth Distribution) सुचवते, ज्यामुळे समाजात आर्थिक दरी कमी होण्यास मदत होईल.
आपण शांती, शांतता, विकास मानसिकता, सांस्कृतिक बदल आणि परस्पर धर्मसहिष्णुतेचा विचार करतो. आजच्या जागतिक संघर्षांच्या काळात (जसे इस्राएल-पॅलेस्टाईन-इराण-अमेरिका किंवा यूक्रेन -रशिया युद्धात) महावीरांची तत्त्वे मार्गदर्शक आहेत. ही तत्त्वे केवळ धार्मिक नसून, सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी उपयुक्त आहेत.
भगवान महावीर यांनी जैन धर्माची उभारणी करताना मानवी उन्नतीच्या सर्वांकष विकासाच्या तत्त्वांचा अवलंब करत नैसर्गिक संतुलन राखण्याचा देखील प्रयत्न केला. शिवाय धर्मात उच्चनीचता राहू नये आणि स्त्री पुरुष भेद बाळगला जाऊ नये याचाही विचार करत धर्म एका निश्चित अशा अधिष्ठानावर उभा केला. म्हणून आज जगातल्या जवळपास सर्वच देशात सुरू असलेल्या कौटुंबिक पातळीपासून ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत असलेल्या विविध प्रश्नांवर जर कुठे उत्तर मिळत असेल तर ते भगवान महावीर यांच्या तत्त्वज्ञानात. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना शतशत नमन
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐




Very well said sir your thought About Bhagwan Mahavir swami are really markable and absolutely different then the society you have really read with devotion about Jeevan of Mahaveer Bhagwan.
Very well said sir your thought About Bhagwan Mahavir swami are really markable and absolutely different then the society you have really read with devotion about Jeevan of Mahaveer Bhagwan.
Thank you 😊