Memory

प्रगतिशील शेतकरी पृथ्वीराज तत्तापुरे यांचे दुःखद निधन.

लातूर दि.24.06.26 औसा तालुक्यातील शिवनी बुद्रुक येथील केशर आंब्याचे मार्गदर्शक तथा प्रगतिशील शेतकरी पृथ्वीराज हरिभाऊ तत्तापुरे यांचे दिनांक 24 रोजी रात्री बारा वाजून पंधरा मिनिटांनी किडनीच्या अल्पशा आजाराने पुणे येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये वयाच्या 62 व्या वर्षी दुःखद निधन झाले.
त्यांचाअंत्यविधी दि . 24 रोज बुधवारी त्यांचे मूळ गावी शिवनी बुद्रुक तालुका औसा जिल्हा लातूर येथील लातूर बाभळगाव निलंगा रोडवर वृक्षाई फार्म हाऊसवर अत्यंत शोकाकुल वातावरणात सायंकाळी चार वाजता अंतिम संस्कार करण्यात आले.
पृथ्वीराज तत्तापूरे यांचे केशर आंब्यावर मोठे काम असून इन सेतू केशर आंबा लागवडी चे महाराष्ट्रातील ते प्रमुख मार्गदर्शक होते.
त्यांनी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात या तीन राज्यांमध्ये आतापर्यंत जवळजवळ दोन लाख केशर आंब्याची लागवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली करून घेतलेली आहे. त्यांच्या पश्चात आई वडील एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ,सुन,नातवंडे, असा परिवार असून ते नांदेड येथील सेवानिवृत्त उप अभियंता जयचंद्र तत्तापुरे यांचे लहान बंधू होत.त्यांच्या दुखद निधनाबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/