Uncategorized

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज कुठे करावा


केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी पात्र व गुणवंत बालकांनी ३१ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले आहे.

शिक्षण, कला व सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य आणि शौर्य यांसारख्या विविध क्षेत्रांत विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेल्या ५ वर्षांपेक्षा अधिक आणि १८ वर्षांपर्यंतच्या अशा बालकांना हा पुरस्कार दिला जातो.
केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार या पुरस्कारासाठीची अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून, इच्छुक उमेदवारांचे अर्ज १ एप्रिल ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत केवळ https://awards.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरच स्वीकारले जातील. या संकेतस्थळाव्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून किंवा ऑफलाईन पद्धतीने प्राप्त होणारे नामनिर्देशन अर्ज स्विकारले जाणार नसल्यामुळे, पात्र बालकांनी विहित वेळेत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/