लातूर पॅटर्न

जेईई-मेन्स-2025 (सेशन–1) परीक्षेत राजर्षी शाहूचे यश

लातूर :जेईई-मेन्स-2025 यावर्षी नॅशनल टेस्टींग एजन्सी (एनटीए) द्वारे घेण्यात आलेल्या पहिल्या सत्राचा निकाल दि. 11 फेब्रुवारी-2025 रोजी जाहीर झाला. सदर परीक्षा दि. 22 जाने. ते 29 जाने., 2025 दरम्यान 10 सत्रात आयोजित करण्यात आली होती. या सत्रात 12,58,136 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
राजर्षी शाहू (कनिष्ठ विज्ञान) महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. महाविद्यालयातील 425 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. पैकी 354 विद्यार्थ्यांचा निकाल आतापर्यंत प्राप्त झाला आहे. त्यामध्ये 99 पर्सेंटाईलपेक्षा अधिक गुण घेणारे 16 विद्यार्थी, 98 पर्सेंटाईलपेक्षा अधिक गुण घेणारे 48 विद्यार्थी, 97 पर्सेंटाईलपेक्षा अधिक गुण घेणारे 63 विद्यार्थी, 95 पर्सेंटाईल पेक्षा अधिक गुण घेणारे 107 विद्यार्थी, 90 पर्सेंटाईल पेक्षा अधिक गुण घेणारे 186 विद्यार्थी, 80 पर्सेंटाईल पेक्षा अधिक गुण घेणारे 229 विद्यार्थी आहेत. भौतिकशास्त्र या विषयात 100 पर्सेंटाईल प्राप्त करणारा 01 विद्यार्थी आहे.
या परीक्षेमध्ये शिवोहम् प्रतापसिंह शिंदे हा विद्यार्थी 99.9087483 इतके पर्सेंटाईल गुण घेऊन महाविद्यालयातून प्रथम आला आहे. सुशांत सुधाकर होळकर हा विद्यार्थी 99.9034510 द्वितीय आला आहे, रोनक निरंजन अग्रवाल 99.8884382 तृतीय क्रमांकावर आहे. सायली किरण पाटील (99.1773389) मुलीत महाविद्यालयातून प्रथम आहे. यश बालाजी कौलासकर (97.532911) अनुसूचित जाती संवर्गातून प्रथम तर ऋषिकेश लिंगरम लगडापोड या विद्यार्थ्याने (95.3086929) पर्सेंटाईल गुणासह अनुसूचित जमाती संवर्गातून प्रथम येण्याचा मान प्राप्त केला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील, उपाध्यक्ष डॉ. पी. आर. देशमुख, सचिव प्राचार्य अनिरूद्ध जाधव, सहसचिव गोपाळ शिंदे, सहसचिव सुनिल सोनवणे व इतर सर्व संचालक, सीईटी-सेल शालेय समिती अध्यक्ष डॉ. सुहास गोरे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, सीईटी-सेलचे संचालक प्रा. दिलीप देशमुख, मुख्य-समन्वयक प्रा. स्वप्निल राजेमाने व आयआयटी बॅचचे समन्वयक प्रा. अभयसिंह देशमुख, इतर सर्व समन्वयक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/