महाराष्ट्र

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती :राज्यस्तरीय निबंध स्पर्धा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत 14 ते 20 एप्रिल, 2026 या कालावधीत राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मुल्ये, सामाजिक न्याय, समता व बंधुता या विषयी जागरुकता निर्माण करणे हा आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी. https://forms.gle/RcFPhcUgY8X4P2NT8 या लिंकवर निबंध अपलोड करावेत, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे या स्पर्धेसाठी विविध गट पाडणण्यात आली असून ते पुढील प्रमाणे

गट – 1 साठी आयटीआय, डिप्लोमा, बायफोकल, एसीव्हीसी विद्यार्थ्यांसाठी शब्दमर्यादा 500 ते 800 शब्द असणार आहे. गट -2 साठी पुरुष, महिलांसाठी खुला गट शब्दमर्यादा 800 ते 1200 शब्द असणार आहे. या दोन्ही गटांसाठी 14 ते 20 एप्रिल, 2026 या कालावधीमध्ये निबंध सादरीकरण निबंध पीडीएफ (हस्तलिखीत किंवा टंकलेखित) स्वरुपात सोबत दिलेल्या लिंकवर अपलोड करणे आवश्यक आहे.

दोन्ही गटातील प्रथम पारितोषिक 31 हजार रुपये व स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक 21 हजार रुपये व स्मृतीचिन्ह‍, सन्मानपत्र, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक ११ हजार रुपये व स्मृतीचिन्ह‍, सन्मानपत्र अशा स्वरुपाचे राहील. निबंध मराठी भाषेतच लिहिणे अनिवार्य आहे. मूळ (ओरिजनल) निबंध असावा. निबंधाची कॉपी आढळल्यास स्पर्धक अपात्र ठरेल. प्रत्येक स्पर्धकाने एकच निबंध सादर करावा व मजकूर शिष्ट आणि सुसंस्कृत असावा. निबंध हस्तलिखित किंवा टंकलिखित स्वरुपात स्वीकारला जाईल. मात्र अंतिम सादरीकरण पीडीएफ स्वरुपातच करणे आवश्यक आहे. निबंध टंकलिखित (टाईप) करुन करुन किंवा हस्तलिखित निबंध स्कॅन करुन https://forms.gle/RcFPhcUgY8X4P2NT8 या लिंकवर अपलोड करावा.
स्पर्धकांनी पूर्ण नाव, गट क्रमांक, संपर्क क्रमांक शाळा, महाविद्यालयाचे नांव व संपूर्ण पत्ता आदी माहिती भरणे आवश्यक आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी सर्व सहभागी स्पर्धकांना डिजिटल प्रमाणपत्र दिले जाईल. या स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी 9152230193 या व्हॉट्सअप क्रमांवर संपर्क करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/