महाराष्ट्र

जिल्हा युवा पुरस्कारासाठी 10 एप्रिलपर्यंत अर्ज सादर करा


विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दरवर्षी जिल्हा युवक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या वर्षीच्या पुरस्कारासाठी युवकांनी आणि युवक संस्थानी 10 एप्रिल पर्यंत जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे अर्ज सादर करावेत असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

राज्याचे युवा धोरण 2012 अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्यावतीने शासन निर्णय 12 नोव्हेंबर, 2013 अन्वये जिल्ह्यात कार्यरत असलेल्या युवक, युवतींना व नोंदणीकृत संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा आणि युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कार दरवर्षी दिला जातो.

युवक, युवतीसाठी पुरस्काराचे स्वरुप गौरव पत्र, सन्मानचिन्ह, रोख पुरस्कार रुपये 10 हजार व संस्थेसाठी गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख पुरस्कार रुपये 50 हजार असे आहे.

यासाठी जिल्ह्यातील युवक, युवती तसेच नोंदणीकृत संस्थांकडून जिल्हा युवा पुरस्कार 2025-26 वर्षाच्या युवा पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत असून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 10 एप्रिल 2026 अशी आहे. यासाठीचे अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातून प्राप्त करुन घ्यावेत व अधिक माहितीसाठी जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/