Special Story

प्रज्ञेतील सनातन नेणी व: मुक्तिदायी जाणीव विकास अडसर

मानवी प्रज्ञेचा प्रवास कसा सुरू होतो.? तो विकास कसा होऊ लागतो? तो आरंभ कोठून होतो? प्रज्ञेत जाणीव कशी निर्माण होते? या प्रज्ञेला जाणिव विकसित करते ?की जाणीवच प्रज्ञाच्या अविष्काराचे स्वरूप धारण करून वर्तनात येत असते. या दोहो जानिवेच्या या प्रज्ञा संबंधाचे स्वरूप कसे बदलते? जानिवेला सुद्धा मुक्तिदायी स्वार्थी लालसेचे कोणते परिमान प्राप्त करून देता येते ?

असे असंख्य प्रश्न प्रज्ञास उपस्थित करते आणि प्रज्ञाच्या प्राथमिक स्वरूपापासून विकसित अवस्थेपर्यंत शोध घेण्याचा प्रयत्न प्रज्ञा स्वतःचा स्वतः प्रयत्न करते तेव्हा प्रथमेशच्या प्रवासाचा प्रारंभ झाला आहे असे म्हणता येते प्रज्ञा ही एक निश्चित नसते ती बहुविध असते ती अनुभव परिस्थिती सातत्य आणि परिणाम यांचे स्वरूप प्राप्त करून आविष्कृत होतात ते असते विकसित होत असते प्रज्ञेला आकलन अनुभव अनुभूती आणि स्वतःचे एक सातत्यपूर्ण संवेदनाचे स्वरूप असेल तर तिच्या प्रज्ञाच्या विकासाच्या वाटा सुरू होत राहतात प्रज्ञेचे निश्चित स्वरूप दाखवते येत नाही निर्णयातून कृतीतून विवेकातून मैत्रीतून मोदी त्याच्या वर्तनातून मुक्तिदायी आग्रहातून न्यायाच्या निष्ठायुक्त वर्तनातून प्रज्ञाला महत्त्व प्राप्त होते. प्रज्ञा निरंतर हे सगळे दृष्टिकोन वर्गीकृत करीत राहते या प्रज्ञाच्या प्रवासाचा जाणीवचा अंतरीक भावा अविष्कार ज्ञानाच्या परिपूर्ण अवस्थेतून तयार होत राहतो जाणीव ही भावना असते जाणीव हे त्या ज्ञान वर्तनाचे बाह्य अविष्कृत कृतीयुक्त वर्तन असते असे प्रज्ञेचे भावनेचे जाणिवेचे एकसंघात वर्तन म्हणजे जाणिवेचा विकास होय जाणीव ही संस्कारीत ज्ञानप्राप्त परिस्थितीच्या अनुभवातून आणि स्वयं विवेकाच्या वर्तनातून विकसित होते का जाणीवला आंतरिक बोधाचे बळ असते जाणीव ही संचित ज्ञानाच्या संचय असल्यामुळे ती त्या व्यक्तीच्या ज्ञानाविष्काराचे निश्चित स्वरूप धारण करून ती अविष्कृत होत राहते थोडक्यात प्रज्ञा जाणीवला मूर्त स्वरूप देते जाणीव प्रज्ञेला परिमाण प्राप्त करून देते हे परिमाण मानवी असते न्यायाचे असते मुक्तिदायी असते विधायक असते कल्याण कार्य असते जाणिवेचे परिमान हे जितके मानव्याच्या हितासाठी विस्तृत होत राहते तितके जाणीवला महत्त्व प्राप्त होते म्हणजेच जाणीव ही निरपेक्ष भेद रहित केवळ मानवी सर्वोच्च न्यायाच्या हिताच्या दुःखमुक्तीच्या प्रयत्नसाठीच आविष्कृत होते तसे आग्रह प्रतीक करते तेव्हा जाणिवेचा अविष्कार हा मानवी सभ्यता धारण करतो शोषण विरहित मानवी वर्तनाचा तो पाया ठरतो तो आग्रह सर्व पातळीवर बाळगला जातो आणि म्हणूनच जाणिवांचे विकसित प्रदेश प्रत्येक मानवी समूहाला आपल्या नैतिक मूल्यात्मक संस्कारित व प्रज्ञाच्या विकासातून स्वतःलाच प्राप्त करावे लागतात हे प्राप्त करीत वर्तन करणे हा ध्यास हा प्रयत्न प्रत्येक जनसमूहाणे त्या त्या कालखंडात बाळगणे अत्यंत आवश्यक असते प्रज्ञेचे पराभव भौतिकता करते जाणीव प्रज्ञाला विवेकानंद संयमाच्या मानवतेच्या दिशेने गतिमान करते मात्र विचलित भौतिकता लालसा आणि भोग विकार आणि पूर्वग्रह सुडा चे आग्रह ही जाणीवला नेहमी दूबळे करतात दूषित करतात जाणीवेला प्रदूषित करतात जाणीवला हिंसेचे स्वरूप प्राप्त करून देतात

जाणीवला म्हणून तर प्रज्ञापासून अध्यात्मच्या तुरुंगात कैद केले जाते. जानिवेला स्वयं शून्य अवस्थेत गुंतवण्याचे आध्यात्मिक प्रयत्न बाह्य व्यवस्था करत असते संस्काराची रोपण त्यासाठीच सतत कुटुंब ते समाज धर्म व्यवस्थेच्या पातळीपर्यंत सगळी सामूहिक प्रयत्न चालू असतात .इथे ते माणसाला घडवण्याची भाषा बोलतात .पण जाणिवेचा विकास होणार नाही .व ती बंदिस्त राहील .ती निष्क्रिय होईल. ती अविष्कृत होणार नाही. ती अध्यात्माच्या भय अवस्थेत गुंतून राहील. असे प्रयत्न ही सगळी आध्यात्मिक सांप्रदायिक व्यवस्था नेहमी हेच काम करत असते ,आणि प्रत्येक व्यक्तीला आपल्या जाणीव चे
संस्कार बाह्य संस्कारीत परिणामाचे स्वरूप किती घातक किती विधायक आहे . हेही वर्तमानच्या जीवनात कळत नाही. धर्म संस्कार सदाचार अध्यात्मिक वर्तन नैतिक वर्तन अशा गोंडस प्रभावाच्या अवस्थेत ती व्यक्ती स्वतःहूनही वर्तन करते आणि आपल्या जाणीव विचार विकास हा विवेकी मुक्तिदायी विकासाच्या पासून
स्वतःच त्यापासून दूर होऊन वर्तन करते आणि म्हणूनच बहुसंख्यांक जनसमुहातील माणसांचा जाणीव विकास हा मुक्तिदायी न होता भौतिकवादी शोषणवादी आणि उपेक्षवादी वर्तन आपण केले तरी चालते अशा समर्थनाचा युक्तिवादाचा व्यवहार दैनंदिन जीवनात चालत असलेला आढळतो जाणीव ठेवा जाणीव असावी जानिव विसरावी. जाणीव त्रासदायक असते जाणीव विधायक पणे बाळगणे आणि वर्तन व्यवहारातील न्यायाचे वर्तन दोन्ही पातळीवर करत राहणे हा मुक्ती दाई सार्वत्रिक जीवनाचा विचार पुढे का जात नाही याचे कारण व्यक्तीच्या प्रज्ञाच्या ठिकाणी नेणिवेचा अबोध प्रदेश त्याच वेळेला वाढत असतो .

नेणीव ही अशी पूर्वग्रह कटुता समाज अनुभव निरीक्षण वास्तवता संस्कार अभाव यातून नेनिवेच अकस्मात वर्तनाचे उत्पात व्यक्ती जीवनात भाषेतून कृतीतून वर्तनातून घडून येत राहतात . नेणीव ही भाषेतून स्वाभाविक वर्तनातून निर्णयातून कृतीतून आपल्या पूर्व कृसंस्कारीत वर्तनाचे अवशेष अविष्कृत करते . यामध्ये प्रज्ञेतील वर्गीकृत जातीय भाव भाषेच्या रूपाने शब्दातून वर्णनातून कृतीतून बाहेर येतात आणि नेणीवप्रज्ञाच्या मुक्तीदायी वर्तनाला प्रतिबंधित करते.

मानवी प्रज्ञेच्या प्रवासा तील नेणिवेचे हे वर्तन वर्ग आणि वर्ण गटातून प्रभुत्व शोषण अधिकाराच्या संधीतून जाणीव सशक्त होत राहते. पुढे या गटातील व्यक्तीचे हिंसा व असत्य वर्तन हे सातत्य पूर्ण राहते .तेव्हा ते पण नेनिवेचे विस्कळीत समर्थनाचे व स्वीकृतीचे दोन्ही पातळीवर वर्तन सुरू होत राहते म्हणजे नेणीव ग्रस्त वर्तन करणाऱ्या सर्वच गटातील व्यक्तींच्या वर्तनात हा परिणाम दिसून येतो आणि ते चूकही वाटत नाही इतका नेनिवेचा भाषिक तूच्छतेचा प्रभाव संवादात कथनात वर्णनात विश्लेषणात हा दिसून येतो ज्ञान व्यवहारांमध्ये नेहमीच हे सगळे विषमतेचे शोषणाचे हिंसेचे समर्थनाचे
प्रयत्न करत राहते इथे प्रज्ञा मुक्तिदायी जाणीवच्या आधारे उपस्थित असूनही प्रज्ञा पराभूत होत राहते मुक्तीदयी जाणीव याचा जनसमुह निष्क्रिय राहतो विवेकाने आग्रहाच्या आधारे तो नेनेवांना प्रतिबंधित करत नाही खरे तर नेणेवांचा पराभव प्रतिरोध हा संघर्षपूर्ण पातळीवर करण्यासाठी मुक्तीदायी जाणिवेचा विकास हाच शिक्षणातून विचारसरणीच्या ज्ञानात्मक आकलनातून संघर्ष लढ्याच्या अनुभवातून इतिहासातून वर्तमानच्या दुःखाच्या वाढत्या प्रदेशातून मुक्तिदायी जाणीव ही विकसित होणे व ती कृतीयुक्त पातळीवरती पुढे जात राहणे हीच मुक्तताई जाणीवची खरी अविष्कृत गरज असते ही होत नाही म्हणूनच हिंसा भेद तूच्छता टोकाचे शोषण स्त्रियांच्या अनन्वित अत्याचाराच्या समर्थनाचे नेणीव वर्तन मानवी सर्व गटाच्या वर्तनातून होत राहते हा सगळा वर्णवर्ग गटांतर्गतचा प्रभुत्ववाद्यांचा पराभव करायचा असेल त्यांचा बंदोबस्त करायच असेल तर नेणिवेचे स्वयम प्रत्येक व्यक्तीच्या वर्तनातील तळ ठाव शोधून घेऊन त्याचा बंदोबस्त करणे त्याचा उद्रेक उत्पाद होऊ देणे आणि मुक्ती जाणीवच्या आग्रहांमध्ये स्वतःला रूपांतरित करणे कृतीयुक्त पातळीवर क्रियाशील ठेवणे हे सर्व चळवळींच्या मध्या अत्यंत आवश्यक आहे शोषण आणि अध्यात्म यांच्या विरुद्ध लढताना प्रज्ञेचा पराभव हे दोन्ही क्षेत्रातील घटक व व्यक्ती खरीच असतात त्यासाठी निष्क्रिय वादाचां स्वीकार करण्यास भाग पाडतात

व्यवस्थेच्या विच्छेदनातून कारणे कळतात उपाय कळत नाहीत धोषणाच्या सूक्ष्म कारण पर्यंत इमला आणि पाया या दिशेने व्यवस्थित चे वर्गीकरण करता येते पोचता येते पण प्रज्ञेच्या उत्पातात नेनिवेच्याच्या उद्रेकात
मुक्तिदायी जाणीवांचा विकास नसल्यामुळे हे सगळे पराभव सातत्याने सर्व जनसमुहाच्या वाट्याला येत राहतात स्वीकारावे लागतात त्यात तो व्यवस्थेच्या पुनर्रचनेचा आग्रही धरतो व्यवस्था सर्वांकष बदलण्यासाठी हितसंबंधांचा संघर्ष उभा राहतो तो करावा लागतो तो मोडून काढावा लागतो इथेही हिंसा घडते इथे इथे वर्णनी वर्गांची मोडतोड करावी लागते इथे वर्णधीष्टीत नेणीवाचा पराभव करून बंदोबस्त ही करावा लागतो पण हे सगळे बाह्य उपाय उपयोगी पडत नाहीत प्रज्ञातून मुक्तिदायी जाणीवचा विकास घडवल्याशिवाय हा बाह्य नेहमीचा सतत विभाजित विषमता मान्य करणारा समर्थन करणारा वर्णनी वंशाच्या वर्गाचे वास्तववादीच ठेवू पाहणारा नेणीव प्रदेश खूप मोठा असतो तो व्यापलेला असतो तो नकळत वर्तनात येत राहतो आणि स्वभाषिक स्वधर्मिक स्वजातीय स्व वांशिक
समान भौतिक हितसंबंधांचे गट आणि वर्ग हेच त्याला खात्रीचे व सुरक्षिततेचे वाटत राहतात म्हणून हे भिन्नभिन्न स्वरूपाचे वर्ग आणि त्या अंतर्गत असणाऱ्या असंख्य गट हीच नेणीवांची एकमेकांना पराभूत करणारी चमत्कारजन्य प्रज्ञेला नेहमी पराभूत करणारी वर्तन प्रक्रिया अमूर्त पातळीवर घडत राहते आणि व्यवस्था बदलात नेहमी अडसर निर्माण होत राहतात हा सगळा प्रज्ञेचा प्रदेश आणि नेणिवेचा अडसर ही मानवी जनसमूहाला प्रत्येक गटाला समाज बदलणाऱ्या स्वप्नवादी विचारसरणीच्या आग्रही कार्यकर्त्यांना समजला पाहिजे आणि मुक्तीदायी जाणीवच्या विकासाचे काम हाती घेतले पाहिजे तरच विषमतावादी अमूर्त हिंसावादी समर्थनियने हे आपल्या उत्क्रांत नेनिव उत्पाताप्रमाणे पुढे येत राहते आणि प्रत्येक समाज बदलाच्या विचारसरणीला चिकित्सेला तर्काला नेणीव अडसर निर्माण करते पराभूत करते म्हणून तत्वज्ञ सुधारक क्रांतिकारक समकालीन समाज बदलणारे कार्यकर्ते यांनी शोषणाविरुद्ध उठवलेले आवाज हे क्षीण करणारी नेणीव याला कारणीभूत असते कारण मुळात प्रत्येक व्यक्तीच्या प्रज्ञा विकासात मुक्तीदायी जाणीवची साक्षरताच निर्माण करण्यामध्ये इथले शिक्षण क्षेत्र इथले प्रबोधन इथली हरेकक्षेत्रातील माणूस घडवण्याची साक्षरता पुढे गेलेले नसल्यामुळे हा सगळा मुक्तिदायी जाणीव विकास अपयशाचा परिणाम सार्वत्रिक पातळीवर सर्व जाती गटांमध्ये सर्व विचारसरणीमध्ये सर्वांना भोगाव लागतो ही मुक्तिदायी जाणीव चे व
नेणिवेच एकमेकांवर परिणाम करणारे हे मूल्य द्वैत भाव
हा पण वर्तनाला आणि प्रज्ञाला व्यापलेला असतो असा विचार आता स्वीकारला पाहिजे तरच हे बदलाचे पाऊल पुढे पडत राहील अन्यथा नेनिवेची सनातनता वर्तमानाच्या मुक्तिदायी आधुनिक जाणीवला अविष्कृत होऊ देणार नाही आणि नेणिवेची सनातनता हीच भारतीय प्रज्ञा विश्वातील मोठी समस्या आहे तीच मुक्तीदायी जाणिवेच्या विकासातील अडसर आहे.

शिवाजी राऊत, जेष्ठ पत्रकार
सातारा

9423032256

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/