FLash

जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना

वीरशैव लिंगायत समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मागणी अनेक वर्षापासून लोकप्रतिनिधी व विविध संघटना मार्फत केले जात होती. राज्यातील सर्व जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या वीरशैव लिंगायत समाजातील युवकांना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळा अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठीच बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना ,कौशल्य विकास प्रशिक्षण योजना, महिला स्वयंसिद्ध व्यास परतावा योजना अशा विविध योजनांचा साठी लाभ मिळवून देण्यासाठी वीरशैव लिंगायत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करण्याकरता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाअंतर्गत उप कंपनी म्हणून जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याचे शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार आज ही अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली.
या महामंडळाची कार्य साधारणपणे पुढील प्रमाणे असून
1. राज्यातील वीरशैव लिंगाय समाजाच्या कल्याण व विकासासाठी काम करणे
2. लिंगायत समाजाच्या व्यक्तींना अल्पदराने स्वयंरोजगाराकरता कर्ज उपलब्ध करून देणे व त्याची वसुली करणे
3. वीरशैव लिंगायत समाजाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पत साधने साधनसामग्री आणि तांत्रिक व व्यवस्थापकीय साधने पुरवणे अशा गोष्टी असतील.
त्याचबरोबर या महामंडळाच्या अंतर्गत पुढील योजना राबवल्या जाणार आहेत
1. रुपये एक लाखापर्यंतची थेट कर्ज योजना. शासनाकडून प्राप्त भाग भांडवलातून महामंडळ ही योजना राबवणार आहे. एक लाख पर्यंतचे थेट कर्ज उपलब्ध असणार आहे. लाभार्थींचा सहभाग यात निरंक असणार आहे ही रक्कम 48 समान मासिक हप्त्यांमध्ये रु.2025 दरमहा नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थींना व्याज आकारण्यात येणार नाही. नियमित कर्जाची परतफेड न करणाऱ्या लाभार्थींना जेवढे कर्जाचे हप्त्यात थकीत होतील त्या रकमेवर दर साल दर शेकडा चार टक्के व्याज आकारण्यात येईल.
2. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना शासनाकडून प्राप्त अनुदान रकमेतून महामंडळ ही योजना राबवणार आहे बँकेकडून कर्ज मर्यादा रुपये दहा लाखापर्यंत असेल या अंतर्गत दहा लाखापर्यंतच्या कर्जावरील व्याज हे महामंडळामार्फत अदा केले जाणार आहे. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला सदर योजनेचा लाभ घेता येईल. यासाठी बेबपोर्टल, महामंडळाच्या प्रणालीवर नाव नोंदणी अनिवार्य ठरते.
3.गट कर्ज व्याज परतावा योजना दहा लक्ष ते 50 लक्ष मर्यादेत बँकेकडून प्रतिगटास कमीत कमी दहा लक्ष ते जास्ती असे 50 लाख रुपये पर्यंतच्या मंजूर उद्योग उभारणी करता कर्ज मंजूर केले जाईल.ते बिनव्याजी दराने दहा लाख रुपये कर्ज देण्यात येईल . मंजूर कर्जावर पाच वर्षापर्यंत कर्ज कालावधी असेल त्या अंतर्गत यावरचे कर्ज व्याज हे महामंडळ मार्फत भरण्यात येईल .
4.शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना. राज्य, देशात, आंतरराष्ट्रीय पातळीवर शिक्षण घेणाऱ्या वीरशैव लिंगायत समाजातील विद्यार्थ्यांना या अंतर्गत शिष्यवृत्ती शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी शैक्षणिक कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे व्याज हे महामंडळ मार्फत भरण्यात येईल. यासाठी विद्यार्थ्यांची वयाचीअट 17 ते 30 वर्षे असून आरोग्य विज्ञान , अभियांत्रिकी, व्यावसायिक व व्यवस्थापन अभ्यासक्रमाशी, अन्नप्रक्रिया व पशुविज्ञान अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना देशांतर्गत दहा लाख रुपये तर परदेशातील शिक्षणासाठी 20 लाख रुपयांची शैक्षणिक कर्ज मर्यादा उपलब्ध असणार आहे .

5.कौशल्य विकास प्रशिक्षण योजना या अंतर्गत सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी कौशल्य प्राप्त करण्याकरिता दहावी पास उत्तीर्ण विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी आवश्यक असणारे आर्थिक सहाय्य या अंतर्गत केले जाणार आहे.
6.महिलांसाठी देखील स्वयंसिद्धा व्याज परतावा योजना राबवली जाणार असून महिला बचत गटांना बँकेमार्फत वितरित केलेल्या पाच ते दहा लाख रुपये पर्यंतच्या कर्जाच्या रकमेवरील 12% पर्यंतचे व्याज हे महामंडळाकडून दिले जाणार आहे. यासाठीच्या काही अटी असून त्या पूर्ण कराव्या लागतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/