Third Eye

आपली मुलं काय करताहेत…

पालकांनो वेळीच सावधान व्हा आणि आपल्या मुलांसोबत अधिकाधिक मैत्रीपूर्व मैत्रीपूर्ण संबंध जोपासत त्यांना मुक्त छंदाने बागडू द्या अन्यथा पश्चातापाची वेळ आल्याशिवाय राहणार नाही

.

यासंदर्भात आपणास अधिक गांभीर्यपूर्वक काही माहिती दिले जात आहे .उत्तर भारतात नुकतीच एक अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे .एकाच कुटुंबातील अनुक्रमे 12 14 आणि 16 वर्षाच्या सख्या बहिणीने रात्री दोन वाजता आपल्या राहत्या घरातून उड्या टाकत आत्महत्या केल्या आहेत .आत्महत्या का केल्या याचा उलगडा त्यानी लिहिलेल्या एका चिठ्ठीतून झाला असून, आई ,बाबा आम्हाला खूप एकलकोंडे वाटत आहे, त्यामुळे एकटे एकटेपणा नको असल्याने आम्ही आत्महत्या करीत आहोत .आम्हाला तुम्ही निश्चित माफ कराल असा संदेश मिळाला आहे . शिवाय त्या मुली ज्या खोलीत राहत होत्या त्या खोलीच्या भिंतीवरही आम्हाला खूप एकट-एकट वाटतय असाच संदेश लिहिलेला होता.

त्यामुळे आपण आपल्या मुलाबाळांची कशी काळजी घेत आहोत हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे .कारण कामकाजा निमित्ताने काही घरातील आई-वडील दोघेही दिवसभर बाहेर असतात आणि संध्याकाळी थकून आल्यानंतर मनोरंजनासाठी मोबाईलचा आसरा घेतात .तर काही घरातील महिला दिवसभर मोबाईलला चिटकून राहिल्यामुळे आपल्या मुलांबाळांमध्ये ते फार मिसळत नाहीत, त्यांच्याशी संवाद होत नाही. परिणामी मुलांना अभ्यासाचा ताण, सामाजिक प्रेशर आणि मनासारख्या होत नसलेल्या गोष्टींमुळे ही मुलं मानसिक आजाराने ग्रस्त होत आहेत. असे जागतिक पातळीवरील एका अभ्यासात दिसून आले आहे. त्यामुळे आपल्या मुलांच्या बाबतीत असे घडू नये म्हणून आपण कमीत कमी मुले घरी असताना तरी करमणुकीचे साधन म्हणून मोबाईल दूर ठेवा त्यांच्याशी मोकळेपणाने वागा बोला त्यांच्या आवडीनिवडी जपा ,शक्य असेल तर शाळेतल्या अनेक प्रसंगा विषयी त्यांच्याशी चर्चा करा. आपल्या घराबाहेर, घराशेजारी, कॉलनीत असणाऱ्या इतर लहान मुलांसोबत त्यांना मुक्तपणे खेळू द्या. त्यामुळे त्यांच्या डोक्यात इतर कोणतेही वेगळे विचार येणार नाहीत आणि आपल्या परिवारावर देखील कोणतेही संकट येणार नाही.
मनोविकार तज्ज्ञांच्या मते ३ ते १७ वयोगटातील ११% मुलांना चिंताविकार होतात, ज्यात अनेकदा दैनंदिन जीवनात व्यत्यय आणणाऱ्या अतिरिक्त भीतींचा समावेश असतो. एडीएचडीमुळे अनेक मुलांचे लक्ष आणि वर्तन प्रभावित होते, तर नैराश्य आणि मनाविरोधी किंवा नकार विकारासारखे वर्तणूक विकार देखील प्रचलित आहेत. हे विकार एकाच वेळी उद्भवू शकतात, आणि कधीकधी वारंवारच्या अपयशामुळे एडीएचडीमुळे चिंता निर्माण होते.
जागतिक आकडेवारीनुसार, २०१९ पर्यंत १०-१४ वयोगटातील मुलांनी दरवर्षी सुमारे ८,३२७ आत्महत्यांमुळे केल्या, म्हणजेच दर १,००,००० लोकांमागे १.३० असा दर आहे, तथापि हा दर देशानुसार आणि सामाजिक-लोकसंख्याशास्त्रीय निर्देशकानुसार मोठ्या प्रमाणात बदलतो. एकूणच तरुणांमधील आत्महत्या (१५-२९) या जगभरात मृत्यूचे तिसरे प्रमुख कारण आहे. सामाजिक कलंकामुळे कमी नोंदणी व कमी आणि मध्यम-उत्पन्न असलेल्या देशांमधील एकूण आकडेवारीवर परिणाम करते.
भारतीय आकडेवारी विचारात घेता दरवर्षी सुमारे १०,७३० आत्महत्यांसह जगभरात किशोरवयीन मुलांच्या आत्महत्यांमध्ये देश आघाडीवर आहे. १९९५-२०२१ या काळात लहान मुले आणि किशोरवयीन मुलांनी १,३४,७३५ आत्महत्या केल्या आहेत, आणि २०१४ नंतर जेव्हा १८ वर्षांखालील मुलांचा शोध घेणे सुरू झाले, तेव्हा या संख्येत वाढ झाली. २०२१ मध्ये, या गटासाठी दर १,००,००० लोकांमागे २१.९ पर्यंत पोहोचला, आणि अंदाजानुसार २०२१ पर्यंत यात वाढ होत राहील; २०२३ मध्ये मुलांच्या आत्महत्यांमध्ये ५.६८% वाढ झाली. अलीकडील आकडेवारीनुसार, शैक्षणिक दबाव, कौटुंबिक समस्या आणि आजारपणामुळे आता मुलींच्या आत्महत्यांचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त बनले आहे.
आपल्या मुलाबाळांची काळजी कशी घ्यावी हे आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही .तरीपण आपण मोबाईल च्या खूप आहारी गेल्यामुळे आपल्याला भान देखील उरत नाही .म्हणूनच वेळीच सावध व्हा मुलांना ,आपल्याला ,आणि परिवाराला सावरायला विसरू नका.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/