कुणी र्हदय देते का र्हदय.. 134 जणांना हवे

हैप्पी व्हॅलेंटाईन डे ….
मित्रांनो आपण प्रेम दिवस साजरा करतो. यानिमित्त आपण एकमेकांची हृदय एकमेकांना सांभाळण्यासाठी देतो. म्हणजेच एकमेकांचे होऊन जातो. पण आपल्याला कोणाचेतरी हृदय मिळावे यासाठी 134 रुग्ण रुग्णालयात हृदयदान करणाऱ्यांची वाट पाहत आहेत. संपूर्ण भारतातून गतप्राण झाल्यानंतर आपल्या शरीराची शरीरातील अवयवांचे दान करण्यासाठी 140 कोटी लोकसंख्या असलेल्या देशातून फक्त 36 हजार लोकांनी नोंदणी केली आहे ही शोकांतिका म्हणावी लागेल.
आपण आपल्या शरीरावर शरीरातल्या अवयवांवर खूप प्रेम करतो त्यामुळे आपल्या नंतर ही अवयव इतर कोणाच्या उपयोगाला येऊन त्यांना जिवंत राहण्यासाठी उपयोगी पडतील तर याच्यासारखे दुसरे चांगले कर्म असू शकत नाही मृत्यूनंतर कोणाच्यातरी शरीरात त्या अवयवाच्या रूपाने, त्या हृदयाच्या रूपाने आपण धडधडत राहाल. यासाठी आपण आणि आपल्या परिसरातील, ओळखीतील, नातेवाईकांतील, मित्रातील प्रत्येकांना अवयव दानाबद्दल सांगून जनजागृती घडून आणावी ही प्रेमाची विनंती.
जमलं तर अवयव दान जनजागृती बद्दल पण बोला खूप लोकं अवयव निकामी झाल्यामुळे दुःखात आयुष्य जगत आहे. प्रतीक्षा यादी खुप मोठी आहे. साधारणतः सध्या राज्यात अवयवांची गरज असणारी रुग्णांची यादी अशी आहे, मूत्रपिंडासाठी ६८५७, यकृतासाठी १८०४, स्वादुपिंडासाठी – ३५, छोटे आतड्यांसाठी -७ हृदयासाठी १३४ आणि फुफ्फुसासाठी ५८ रुग्ण प्रतीक्षेत आहेत. तर काही रुग्ण हाताच्या प्रतीक्षेत सुद्धा आहेत. शेअर करा आणि शक्य असेल तर अवयवदानाचा अर्ज भरा.
अवयव दान करण्यासाठी ज्या वेबसाईटवर आपल्याला नोंदणी करायचे ती वेबसाईट खालील प्रमाणे
👇👇👇👇
https://notto.abdm.gov.in/dashboard
विविध अवयव दानाची वाट पाहणारे पेशंटची संख्या👇👇




