मराठवाडा

मराठवाडा तहानलेलाच ठेवण्याचा मेरीचा घाट

लोकप्रतिनिधी मात्र निद्रिस्त अवस्थेत

जानेवारी महिन्यात मेरी अभ्यास गटाने जायकवाडी धरणाबाबत दिलेल्या अन्यायकारक अहवालामुळे मराठवाड्यातील तब्बल सात महिने पुरेल इतके पिण्याचे पाणी आणि जवळपास 11 महिने पुरेल इतके औद्योगिक वापराचे पाणी पळवण्याचा घाट घातला आहे. याबाबत मराठवाड्यातील बहुसंख्य लोकप्रतिनिधी याबाबतीत अजूनही निद्रिस्तच असल्याचे दिसून येते.

या संदर्भात 2फेब्रवारी 2025 रोजी जायकवाडी धरणाच्या हक्काच्या पाणी प्रश्नावर मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींना एकत्र आणण्यासाठी औद्योगिक संघटना असलेल्या ‘मसीआ’ संघटनेच्या माध्यमातून ‘जल समृद्धी प्रतिष्ठान’तर्फे चर्चा सत्र आयोजित करण्यात आलं होतं. पाण्याच्या प्रश्नासाठी लोकप्रतिनिधी एकत्र येऊन काम करणार असल्याचा विश्वास मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केला होता .या परिषदेसाठी आमदार विक्रम काळे , आमदार कैलास पाटील ,आमदार प्रशांतबंब,आमदार रमेश बोरनारे,आमदार अनुराधा चव्हाण आणि माजी आमदार राजेश टोपे सा. बां. विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण,जलतज्ज्ञ ,डॉ.या.रा.जाधव,संजय लाखे पाटील,आयोजक डॉ शंकर नागरे उद्योजक मुकुंद कुलकर्णी,रमाकांत पुलकुंडवार,अभियंता जयसिंह हिरे,सर्जेराव वाघ,आणि महेंद्र वडगांवकर यांची उपस्थिती होती.

जायकवाडी प्रकल्पात 15 ऑक्टोबर ला 65 टक्के( 1410.50 दलघमी) ऐवजी 58 टक्के (1258.60 )पाणी साठा करावा असा निर्णय मेरी च्या अभ्यास गटाने दिला आहे . पाणी साठ्यात 7 टक्के म्हणजे 151.99 द ल घ मी. कपात सुचवली आहे. जायकवाडी धरणातून पिण्याच्या पाण्याच्या विविध योजनांसाठी 283.27 द ल घ मी.पाणी आरक्षित आहे .म्हणजे साडे सहा महिने पिण्यासाठी पाणीपुरवठा होऊ शकेल एवढ्या पाण्याची कपात प्रस्तावित केलेली आहे.जायकवाडी धरणातून प्रस्तावित पाणी उपश्यावर एक नजर टाकू यात( सर्व आकडे द ल घ मी.मध्ये)
1)औद्योगिक वापर योजना 160.74
2) पिण्याचे पाणी योजना 283.27
3) वैयक्तिक उपसा पंप 64.88
4) ब्रह्मगव्हान उ सि यो 1 व 2- 27.52
5) तंजापुर उ सि यो 1 व 2- 109.75
6) एकूण एकंदर – 646.16
यातील 646 पैकी 190.75 द ल घ मी पाणी अहिल्या नगर ला देण्यात येणार म्हणजे मराठवाड्यात राहिले 546.41 द ल घ मी.मग कालव्याद्वारे प्रवाही सिंचनासाठी उरते 1258.60-646.16=612.44 द. ल. घ. मी. म्हणजे 50 टक्के पेक्षा कमी पाणी कालव्याद्वारे रब्बी सिंचनासाठी उपलब्ध होऊ शकेल.
या संदर्भात लातूर येथे पाणी परिषद घेतली जाणार असल्याचे एड. व्यंकट बेद्रे यांनी कळवले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/