कुंभमेळा महाकुंभ मेळा का…
सनातन हिंदु धर्मात पवित्र मानलेल्या महाकुंभ मेळा-2025 अंतिम पर्वाकडे वाटचाल करीत आहे. 144 वर्षानंतर आलेल्या शुभ मुहूर्तावर पवित्र स्नान करणाऱ्यांची संख्या 50 कोटी पेक्षाही अधिक असल्याचे मानले जाते. या महाकुंभ मेळा संदर्भात स्थानिक पातळीपासून ते जागतिक पातळीपर्यंत अनेक प्रकारच्या चांगल्या वाईट प्रतिक्रिया, आरोप प्रत्यारोप झाले. या कुंभमेळावर खर्च होणाऱ्या दहा हजार करोड रुपये खर्चावरून सुरू झालेला हा वाद-विवाद अनेक वळणावर वाढतच गेला.
कोणत्याही धर्म, पंथ, समुदायात जेव्हा एखाद्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते तेव्हा आरोप – प्रत्यारोप होत असतात. तसे आरोप महाकुंभ मेळा आयोजना संदर्भातही झाले. परंतु भाविकांची श्रद्धा आणि हिंदू जनजागरण मधील लोकांचा सहभाग व आस्था या दोन्ही गोष्टी आणि 144 वर्षानंतरचा आलेला हा पर्वणीचा योग पुन्हा आयुष्यात येणार नाही म्हणून भाविकांनी कुंभमेळ्याला प्रचंड प्रमाणात हजेरी लावली. मिळाला हवसे नवसे आणि… या तिघांमुळे प्रचंड गर्दी झाली. त्यातच प्रशासनाने केलेल्या सुविधा अपुऱ्या पडणार नाहीत याची दक्षता घेत प्रत्येक वेळी सुधारणा करत महाकुंभात भाविकांना अडचण होणार नाही याची काळजी घेतल्याचे दिसून येते. तरी देखील काही खोडसाळ पद्धतीने चुकीच्या बातम्या देऊन महा कुंभाबद्दल गैरसमज निर्माण करणाऱ्या 50 पेक्षा अधिक समाज माध्यम चालकांवर शेवटी आज प्रशासनाने गुन्हे दाखल केले. अशा प्रकारच्या घटना घडतील हे अपेक्षितच होते. कदाचित त्याने प्रशासनातली चूक दाखवण्याचा देखील प्रयत्न केला, असेल पण ती पद्धत मात्र चुकीची असू शकते, जेव्हा कोट्यावधी लोक एकत्र येतात तेव्हा छोटीशी अफवा देखील भयंकर ठरु शकतात.
कुंभमेळा 2025 हा महाकुंभ का आहे
कुंभमेळ्याचे प्रकार:
कुंभमेळ्याचे चार प्रकार आहेत – कुंभ, अर्धकुंभ, पूर्ण कुंभ आणि महाकुंभ.
दर १४४ वर्षांनी प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा,प्रयागराज आणि हरिद्वार येथे दर ६ वर्षांनी अर्धकुंभमेळा, तर पूर्ण कुंभमेळा: दर १२ वर्षांनी भरणारा हा मेळा प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन चार ठिकाणी भरतो.
कुंभमेळा आणि आखाडा काय आहे समिकरण
कुंभमेळ्यात सातत्याने विविध आकड्यांची चर्चा ऐकायला मिळते हे आखाडे काय आहेत आणि त्यांची सुरुवात कोणी केली ते पाहू आदि शंकराचार्यांनी अशा काही संघटना निर्माण केल्या होत्या, ज्यांना अखाडे असे नाव देण्यात आले.या आखाड्यांमध्ये समाविष्ट असलेले संत आणि ऋषी हिंदू धर्माच्या ग्रंथांचे आणि धार्मिक स्थळांचेही रक्षण करतात व परंपराही जपतात. भारतातील मुख्य आखाडे कोणते.
भारतात एकूण १३ प्रमुख आखाडे आहेत, जे उदासी, शैव आणि वैष्णव पंथातील भिक्षूंचे आहेत. यामध्ये ७ आखाडे शैव संन्यासी पंथाचे आहेत, तर बैरागी वैष्णव पंथाचे तीन आखाडे आहेत. तर, उर्वरित तीन आखाडे उदासी पंथाचे आहेत. या अखाड्यांचा इतिहास शतकानुशतके जुना असल्याचे म्हटले जाते. प्रमुख धार्मिक विधींमध्ये या अखाड्यांचे महत्त्व दिसून येते.

कुंभमेळा म्हटला की नागासाधू आणि नागासाधूंचे आकर्षण आणि चर्चा कुंभमेळ्याच्या केंद्रस्थानी असते. कुंभमेळ्यात नागा साधू हे सनातन धर्माच्या तपस्वी परंपरेचा एक महत्त्वाचा भाग मानले जातात. कुंभमेळ्यात नागा साधूंना स्नान करण्याचा पहिला मान दिला जातो. कुंभमेळ्यानंतर, हे साधू हिमालयातील गुहांमध्ये जातात, जिथे ते कठोर तपस्या करतात.
नागा साधूंशी संबंधित आणखी काही गोष्टी:
नागा साधू हे शिव किंवा विष्णूचे उपासक आहेत.
नागा साधूंची दीक्षा आणि वर्गीकरण प्रमुख कुंभमेळ्याच्या कार्यक्रमांमध्ये होते.
नागा साधूंचे जीवन खूप गुंतागुंतीचे आहे.
नागा साधू होण्यासाठी १२ वर्षे कठोर तपस्या करावी लागते.
नागा साधूंचे मुख्य उद्दिष्ट आत्मसाक्षात्कार, धर्माचे रक्षण आणि मोक्ष प्राप्त करणे आहे.
नागा साधूंच्या पूजा पद्धतीत, शिवलिंगावर राख, पाणी आणि बेलपत्र अर्पण केले जाते.
नागा साधूंच्या अलंकारांमध्ये कमरेचा वस्त्र, भाभूत, चंदन, लोखंडी किंवा चांदीच्या बांगड्या, अंगठी, पंचकेश, कमरेला माळ, कपाळावर रोली, कानातले, चिमटे, डमरू, कमंडल, विणलेले ड्रेडलॉक, टिळक, काजळ, हातावर बांगड्या आणि हातावर रुद्राक्षाचे मणी यांचा समावेश आहे.
नागा साधू
किन्नर आखाडा.
सर्वोच्च न्यायालयाच्या2014 च्या स्त्री पुरुषानंतर किन्नर वर्गवारी ला मान्यता दिल्यानंतर, २०१५ मध्ये, महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी सनातन धर्मात सामील होऊन किन्नर आखाडा स्थापन केला जाईल.हा विचार लक्षात घेऊन, १३ ऑक्टोबर २०१५ रोजी किन्नर आखाडा बांधण्यात आला. हरिगिरी महाराजांच्या आशीर्वादाने, २०१६ मध्ये उज्जैनमध्ये पहिला कुंभ आयोजित करण्यात आला होता आणि २०१९ मध्ये, जुना आखाड्यासह किन्नर आखाडा देखील प्रयागराजमधील अर्धकुंभात सहभागी झाला होता. २०२१ मध्ये त्यांनी हरिद्वार येथील कुंभमेळ्यातही भाग घेतला होता.
किन्नर महामंडलेश्वर 👇👇👇👇




छान आर्टिकल आहे.