मराठी सिनेमाला अच्छे दिन येणार?

जागतिक पातळीवर विविध क्षेत्रातील तांत्रिक प्रगतीचे परिणाम त्या त्या क्षेत्रात दिसून येत आहेत. सिंगल पडदा असणाऱ्या चित्रपट गृहा ऐवजी मल्टिप्लेक्स आणि मेगाप्लेक्स ही संकल्पना 90 च्या दशकापासून वेगाने पसरली असून सिंगल पडदा थिएटर कालबाह्य ठरत आहेत.असे सिंगल पडदा चित्रपट गृह पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
राज्यातल्या 1200 पेक्षा अधिक सिंगल पडला असणारे चित्रपटगृहापैकी अनेक चित्रपटगृह बंद पडले आहेत. ते पुन्हा सुरू करून तेथे फक्त मराठी सिनेमा चालवावेत चालवण्याचा प्रयोग महाराष्ट्र शासनामार्फत करण्यात येणार आहे त्यामुळे मराठी सिनेमाला अच्छे दिन येणार की काय अशी अशा मराठी सिने रसिकांना वाटायला लागली आहे या संदर्भात नुकतीच एक बैठक पार पडली असून त्यात मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांनी मंत्री ॲड आशिष शेलार यांच्याकडे वेळोवेळी मांडलेल्या समस्यांपैकी एक पडदा चित्रपटगृहाच्या समस्येविषयी आज मंत्रालयातील दालनात चर्चात्मक बैठक घेण्यात आली. राज्यामध्ये १२०० हून अधिक एक पडदा चित्रपटगृहे असून त्यातील फक्त ४७५ चित्रपटगृहे सुरु आहेत. त्यामुळे उर्वरित सिनेमागृहांच्या सद्यस्थितीबद्दल उपलब्ध माहिती मिळवावी आणि बंद असलेली चित्रपटगृहे पुन्हा चालू करून त्यांनी फक्त मराठी सिनेमा दाखवावा आणि या चित्रपटगृहांना सवलती देण्याबाबतच्या स्वतंत्र योजनेचा मसुदा तयार करण्यात यावा, असे संबंधित विभागाला मंत्री ॲड. शेलार यांनी आदेश दिले. येत्या पंधरा दिवसांत ही योजनेचा मसूदा सादर करून योजने संदर्भातील तज्ञ, थिएटर मालक, संबंधित अधिकारी या सर्वांसोबत बैठक घेऊन ही योजना जाहीर करू असे देखील मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.
त्यामुळे सिंगल पडदा चित्रपट गृह पुन्हा सुरू होण्याची आशा यामुळे निर्माण झाली आहे. अशी चित्रपटगृहे मल्टिप्लेक्स किंवा मेगाप्लेक्स च्या तुलनेत कमी खर्चिक असतात त्यामुळे सामान्य सिने रसिकांच्या खिशाला झळ देखील बसणार नाही.



