लातूर जिल्हा
परमेश्वर शिंदे लातूर भूषण पुरस्काराने सन्मानित

लातूर: परमेश्वर सतबाजी शिंदे, प्रयोगशाळा सहाय्यक, राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर यांना वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक कार्य व उत्कृष्ट कामागिरी करत असल्याबद्दल त्यांना श्री. छत्रपती शिवाजी महाराज फेस्टिवल तर्फे मा.खा.डॉ. गोपाळरावजी पाटील, देविदासजी काळे साहेब यांच्या हस्ते लातूर भूषण पुरस्कार देऊन विशेष गौरव करण्यात आला.
त्यापूर्वी देखील परमेश्वर शिंदे यांना त्यांच्या विविध कार्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत त्यांचे सामाजिक कार्यात योगदान महत्त्वाचे मानले जाते त्यांच्या या सन्मानाबद्दल राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ महादेव गव्हाणे, कार्यालयीन अधीक्षक जगन्नाथ क्षीरसागर यांच्यासह त्यांच्या सहकार्यानीं अभिनंदन केले आहे.



