धार्मिकतेतून सामाजिक एकात्मतेचा संदेश: डीवायएसपी भातलवंडे

रमजान हा हिंदूंसाठीच्या श्रावण महिन्याप्रमाणेच पवित्र महिना असून या महिन्यात विविध मानवी कल्याणासाठी च्या प्रार्थना आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या महिन्यातील हे विशेष उपक्रम वैयक्तिक पातळीपासून ते सामाजिक पातळीपर्यंत एकमेकांना घट्ट जोडून ठेवण्यात खूप उपयुक्त ठरतात, असे विचार उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गजानन भातलवंडे यांनी व्यक्त केले.
उपविभागीय पोलीस कार्यालय उदगीर च्या वतीने विस्तार पार्टी निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते याप्रसंगी उदगीर शहर पोलीस ठाणे आणि ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांची यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
सध्या जागतिक पातळीवर वातावरण खूपच अस्थिर असून असुरक्षितता मोठ्या प्रमाणात पसरली आहे. परंतु आपण भारतात आणि त्यातल्या त्यात पुरोगामी महाराष्ट्रात जन्म घेतला असल्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारच्या भीतीचे कारण नाही, असुरक्षिततेचे कारण नाही .म्हणून आपण सर्वांनी एकोप्याने राहून सामाजिक आणि राष्ट्रीय उन्नतीसाठी आपले हातभार लावावेत. त्यासाठी असे विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रम महत्त्वाचे ठरतात असा विचार देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
समाजातील वेगवेगळ्या जाती-धर्माच्या लोकांनी एकमेकांच्या जाती धर्माचा आदर करून देशाच्या उन्नतीचा आणि प्रगतीचा मार्ग प्रशस्त केला पाहिजे असाही संदेश त्यांनी यावेळी दिला. या कार्यक्रमास उदगीर शहरातील बहुसंख्य रोजेदार मुस्लिम बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते



