लातूर जिल्हा

लातूर येथे 13 मार्च रोजी प्लेसमेंट ड्राईव्ह


जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडीत दीनदयाल उपाध्याय जागेवरच निवड संधी (प्लेसमेंट ड्राईव्ह)चे शुक्रवार, 13 मार्च, 2026 रोजी सकाळी 11 वाजता लातूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे आयोजित करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यात नामांकित आस्थापना, उद्योजक सहभागी होणार आहेत. या आस्थापनेमध्ये दहावी, बारावी, कोणतीही पदवी, पदव्युत्तर पदवी, आय.टी.आय., डिप्लोमा, तसेच इतर शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांना सहभागी होता येणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी शुक्रवार, 13 मार्च, 2026 रोजी सकाळी 11 वाजता लातूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तंत्र प्रशाला केंद्र, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालया समोर, लातूर येथे स्वखर्चाने मुलाखती करीता आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, स्वत:चा रिझ्युम, बायोडाटा, पासपोर्ट फोटो इ. (तीन प्रती) सह उपस्थित रहावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, लातूर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/