लातूर जिल्हा

पर्यायी शिक्षण शक्य आहे याविषयावर डॉ. अभय बंग यांचे व्याख्यान

पर्याय शिक्षण शक्य आहे या विषयावर उद्या गुरुवार 12 रोजी शाहू व्याख्यानमाले अंतर्गत माननीय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि पद्मश्री डॉक्टर अभय बंग यांचे शाहू महाविद्यालयात सायंकाळी 5 वाजता व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील हे असणारा आहेत . शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे नूतन पदाधिकारी उपाध्यक्ष डॉ. अजय जाधव ,सचिव श्री बी.बी. ठोंबरे ,सहसचिव डॉ शिवाजीराव सूर्यवंशी, उद्धव पाटील यांच्यासह अन्य संचालक सदस्य देखील उपस्थित राहणार आहेत.
सदर व्याख्यानास शिक्षणप्रेमी सामाजिक भान असणारे सामाजिक चळवळीशी संबंधित असणारे आणि शिक्षणाची आवड असणारे व इतर सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक डॉ. संभाजी पाटील ,प्राचार्य डॉ महादेव गव्हाणे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/