देश -विदेश

कर्मकांड वाढतच गेलं दारिद्र्य घरी पुन्हां आलं

भुकेल्यांना अन्न
तहानलेल्याला पाणी….
गरीबांना शिक्षण
द्या म्हणणाऱ्या संत गाडगेबाबा यांची आज जंयती

राष्ट्रसंत
=====
राष्ट्रसंत गाडगे महाराज
आठवण येते रोज रोज

घाण करणारे माणसं
वाढत गेली दर दिवस

रोगराईन बेजार झाली
औषधन खिसा खाली

नवस फेडता फेडता
वाढतो कर्जचा हप्ता

कर्मकांड वाढतच गेलं
दारिद्र्य घरी पुन्हां आलं

मुलांना शाळेत घाला
सुखं लाभे जीवनाला

देव शोधावा माणसात
प्रगती फक्त शिक्षणात

स्वच्छता विना आरोग्य
घाण वाढवत जाई रोग्य

अन्नपाणी कोणास द्यावे
गरजवंतास ओळखावे

बांधल्या अनेक धर्मशाळा
मानवतेचा फुलवला मळा

खाऊ नये कधीच फुकट
खावे करून नेहमी कष्ट

सत्याची केली राखण
स्वच्छतेचा मंत्राची देण

सोडून घरदार आयुष्यभर
जनसेवेचा केला स्वीकार

आम्हा दावीला सत्य मार्ग
तेच नंदनवन सुखाचा स्वर्ग

सहज सोपे अखंड प्रबोधन
जीवन सुखी करता ग्रहण

तुमची कृती तुमची वाणी
फक्त आठवते जन्मदिनी

नाथा नागनाथा करी निश्चय
स्वच्छतेची पूजा रोज करीन
सत्य जाणून सोडून अंधश्रद्धा
गाडगे महाराजांसं करी नमन

इंजिन. नागनाथ कलवले लातूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/