असंसर्गिक आजार व सुरक्षित मातृत्वासाठी

अलिकडच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात भौतीक प्रगतीबरोबर नवनवीन आजाराचे प्रमाण वाढत चालले आहे.त्याचा परिणाम मानवी जीवनात विविध आजाराने ठाण मांडले आहे. म्हणूणच बदलत्या जीवनशैलीबरोबर जडणाऱ्या विविध आजारांबाबत विचार करणे अनिवार्य बनले आहे.
जगात माता-मृत्यू आणि प्रसूतीनंतरच्या आरोग्यसमस्यांमध्ये वाढ होत असताना, जागतिक आरोग्य संघटना (WHO) गर्भवती आणि प्रसूत महिलांवर वाढत चाललेल्या असंसर्गिक आजारांचे (NCDs) धोका लक्षात घेऊन नवे वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्याच्या तयार करणार आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, आणि लठ्ठपणा यांसारखे आजार आता मातृत्वाशी निगडित आरोग्यविषयक धोके म्हणून पाहिले जात आहेत आणि यावर तातडीने लक्ष देणे आवश्यक ठरले आहे.

चिंता करायला हवी का?
WHO च्या ताज्या आकडेवारीनुसार सुमारे २३% माता-मृत्यू ‘अप्रत्यक्ष कारणांमुळे’ होतात — म्हणजेच ते थेट प्रसूतीशी संबंधीत नसून पूर्वीच्या किंवा गर्भावस्थेत उद्भवलेल्या असंसर्गिक आजारांमुळे घडतात. बाळांतपणातील मृत्यू मुख्यत्वे प्रसूतीनंतरच्या रक्तस्राव किंवा संसर्गामुळे होत असतात, पण आता असंसर्गिक आजार हे उद्भवताना दिसतात. कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ह्या समस्येचा परिणाम अधिक तीव्र असून, त्या देशांच्या आरोग्यसेवा व्यवस्थेवरही मोठा ताण पडतो आहे.
हा धोका कसा उद्भवतो
आधीपासून अस्तित्वात असलेले आजार: काही महिलांना गर्भधारणेपूर्वीच मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदयविकार असतात. गर्भधारणेदरम्यान या आजारांमुळे गुंतागुंत व समस्या वाढू शकते किंवा उद्भवु शकते.
गर्भावस्थेत नव्याने उद्भवणारे आजार: काही महिलांना गर्भधारणे दरम्यान प्रे-एक्लेम्प्सिया (गर्भावस्थेतील उच्च रक्तदाब), गर्भधर्मीय मधुमेह (gestational diabetes) इत्यादी आजार निर्माण होतात, जे आई आणि बालक दोघांसाठी धोका असतो.
WHO काय करणार आहे?
यांसदर्भात लवकरच यासदंर्भातील जागतिक स्तरावरील तज्ञांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत पुढील मुख्य मुद्यावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे: नवीन वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वे आखणे, ज्यात गर्भवती महिलांच्या आरोग्यात असणाऱ्या असंसर्गिक आजारांचे निदान, व्यवस्थापन व प्रतिबंध यासाठी सपष्ट प्रोटोकॉल तयार केले जातील. मार्गदर्शक तत्त्वे आरोग्यसेवा प्रणालींमध्ये कशा रितीने अंमलात आणता येतील, त्यावर धोरणात्मक चर्चा होईल. कमी व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी संसाधन अनुकूल शिफारसी केल्या जातील ज्यात — प्राथमिक आरोग्यसेवा केन्द्रांपासून ते तज्ज्ञांनी संचालित रुग्णालयांपर्यंत लागू करायच्या पद्धतींचा समावेश असेल.
स्थानिक आरोग्यव्यवस्थेसाठी काय सूचनाअसतील
गर्भनिरिक्षणात NCDs चे नियमित स्क्रीनिंग समाविष्ट करणे (उदा. रक्तदाब, रक्तातील साखर, BMI मापन).
उच्च जोखमीच्या महिलांसाठी विशेष फॉलो-अप आणि समन्वित केअर — स्त्रीरोग-हृदय रोग तज्ज्ञ व डायबेटोलॉजिस्ट यांचा समावेश करणे .पोषण व वजन व्यवस्थापनासाठी समुदायआधारित कार्यक्रम, गर्भवती महिलांसाठी आरोग्यशिक्षण. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये साधे परंतु प्रभावी मार्गदर्शक साधने प्रशिक्षण पुरवणे.
प्रसूतीनंतर देखील असंसर्गिक आजारांवरील सतत निगराणी करणे, कारण अनेक समस्या प्रसवानंतरही वाढतात. वेळेवर निदान: गर्भधारणेपूर्वी आणि गर्भधारणेदरम्यान असलेल्या आजारांचे वेळेवर निदान केल्यास गुंतागुंत कमी होतात. प्रसूतीसेवा व NCD व्यवस्थापन यांच्यात समन्वय असावा. काही प्रतिबंधात्मक उपाय जसे पोषण, धूम्रपान-निवृत्ती, शारीरिक सक्रियता वाढविणे व आरोग्य शिक्षण हे लक्षणीय फरक घडवू शकतात. संबंधित गर्भवतींची नियमित नोंद राखली गेली पाहिजे, ज्यामुळे धोरणे आणि हस्तक्षेप प्रभावीपणे मोजता येतील.
महाराष्ट्र व ग्रामीण भागांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांवर साध्या स्क्रीनिंग साधनांची उपलब्धता आणि आरोग्य कर्मचारी प्रशिक्षणात वाढ करणे. ग्रामीण भागातील महिलांसाठी आरोग्य शिबिरे आणि पोषण व जीवनशैली विषयक कार्यशाळा आयोजित करणे. गर्भवती व प्रसूत महिलांसाठी मोबाइल हेल्थ (mHealth) सेवा वापरून रेग्युलर निगराणी व सल्ला देणे उपयोगी ठरू शकते.
WHO च्या या उपक्रमामुळे मातृत्वाशी जोडलेल्या असंसर्गिक आजारांवर जागतिक लक्ष वेधले जाणार आहे आणि योग्य मार्गदर्शक तत्त्वे लागू झाली तर ते सुरक्षित मातृत्वासाठी महत्त्वाचे पाऊल ठरू शकते. भारतासारख्या देशांसाठी — जिथे माता-मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी अशा मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करणे, प्राथमिक आरोग्यसेवा मजबूत करणे आणि समुदायावर आधारित प्रतिबंधात्मक कार्यक्रम सुरु करणे अत्यावश्यक ठरणार आहे.



