कांदा:जेवणाची लज्जत अन् आरोग्याची संगत

कांद्याला बाजारात भाव नसल्याने शेतकऱ्याला रडवतोय आणि शेतकरी कांद्याला भाव देण्यासाठी सरकारला कोंडीत धरण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हाच कांदा सर्वसामान्यांच्या आयुष्यात दैनंदिन जीवनात त्याला निरोगी ठेवण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावतो.
आपल्या भारतीय स्वयंपाकघरात कांद्याशिवाय जेवणाची कल्पना करणे कठीण आहे. भाजीची चव वाढवण्यापासून ते सॅलडपर्यंत कांद्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, अनेक जण विचारतात की,’कच्चा कांदा खाणे खरोखर आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?’या लेखात आपण कच्च्या कांदा खाल्ल्यानंतर होणारे फायदे आणि काही मर्यादा समजून घेणार आहोत.

कच्चा कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे -पचनशक्तीत सुधारणा होते. कारण कच्च्या कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात ‘डायटरी फायबर’ आणि ‘प्रीबायोटिक्स’ असतात. हे घटक आतड्यांच्या आरोग्यासाठी उत्तम असून पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. यामुळे बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर राहतात.
हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी कांद्यामध्ये असलेल्या सल्फर संयुगांमुळे (Sulfur compounds) रक्तातील ‘बॅड कोलेस्ट्रॉल’ कमी होण्यास मदत होते. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
रोगप्रतिकारशक्तीत वाढ (Immunity).कांद्यात ‘व्हिटॅमिन सी’ आणि ‘क्वेरसेटिन’ (Quercetin) नावाचे शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट्स असतात. हे घटक शरीराला व्हायरल इन्फेक्शन आणि आजारांशी लढण्यास बळ देतात.
रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते.काही संशोधनांनुसार कच्चा कांदा मधुमेही रुग्णांसाठी गुणकारी ठरू शकतो. तो रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्यापासून रोखण्यास मदत करतो.
हाडांची मजबूती राखतो.कांद्यामध्ये असे घटक असतात जे हाडांची घनता (Bone Density) वाढवण्यास मदत करतात, ज्यामुळे वृद्धपकाळात हाडांचे आजार होण्याचा धोका कमी होतो.
कच्चा कांदा खाताना कोणती काळजी घ्याल -कोणतीही गोष्ट अति प्रमाणात केल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात, तसेच कांद्याच्या बाबतीतही आहे.
श्वासाची दुर्गंधी, कच्चा कांदा खाल्ल्यानंतर त्यातील सल्फरमुळे श्वासाला उग्र वास येतो, जो अनेकदा सामाजिक ठिकाणी अस्वस्थ करू शकतो. ऍसिडिटी आणि जळजळ, ज्यांना पोटाचे जुने आजार आहेत किंवा ज्यांना ‘गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स’ (GERD) चा त्रास आहे, त्यांना कच्चा कांदा खाल्ल्याने छातीत जळजळ किंवा ऍसिडिटी होऊ शकते.
ॲलर्जीत, काही व्यक्तींना कांद्याची ॲलर्जी असू शकते. यामुळे अंगावर खाज येणे किंवा त्वचेचे इतर विकार होऊ शकतात.
शस्त्रक्रियेपूर्वी कांदा खाने टाळा जर तुमची कोणतीही शस्त्रक्रिया होणार असेल, तर कांद्याचे अतिसेवन टाळावे, कारण ते रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम करू शकते.
कांदा कसा खावा?
कच्चा कांदा आरोग्यासाठी नक्कीच उत्तम आहे, परंतु तो घेताना काही गोष्टींची दक्षता घ्यावी, जेवणासोबत एक मध्यम आकाराचा कांदा सॅलड म्हणून घेणे पुरेसे असते.
दुर्गंधी कशी घालवाल? कांदा खाल्ल्यानंतर पुदिन्याची पाने, बडीशेप किंवा लवंग तोंडात टाकल्यास श्वासाची दुर्गंधी सहज निघून जाते. त्रास होत असल्यास ,जर तुम्हाला कच्चा कांदा पचत नसेल, तर तो हलका परतून किंवा भाजीमध्ये शिजवून खाणे हा उत्तम पर्याय आहे. आरोग्याच्या दृष्टीने कच्चा कांदा हा एक ‘सुपरफूड’ आहे. जर तुम्हाला कोणतीही गंभीर आरोग्य समस्या नसेल, तर आजपासूनच तुमच्या जेवणात सॅलडच्या स्वरूपात कच्च्या कांद्याचा समावेश नक्की करा! ज्यामुळे कांद्याला सतत बाजारात मागणी राहील आणि शेतकऱ्यांनी पिकवलेला कांदा देखील उपयोगात येईल.



