लातूर जिल्हा

धरणे भरली पुराचा धोका वाढला,नदीपात्रात विसर्ग सुरु

दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसाच्या रिपरिपीमुळे जिल्ह्यातील धरणे जवळपास भरली असून आज सकाळी माकणीतून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. नदीकाठच्या सर्व गांवाना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

सततचा पावसामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली असून मांजरा धरणाचा पाणीसाठा ७० टक्के, निम्न तेरणा धरणाचा ८८ टक्के, तर औसा तालुक्यातील तावरजा मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा ७३ टक्के झाला आहे. सध्या या धरणांमध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू असून, धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. यामुळे अतिरिक्त पाणी मांजरा, तेरणा आणि तावरजा नदीपात्रात सोडावे लागणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिक, शेतकरी आणि वस्त्यांमध्ये राहणाऱ्यांना सतर्क राहण्याचा आणि विशेष खबरदारी घेण्याचा इशारा लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिला आहे.

नागरिकांना नदीपात्रात जाणे टाळण्याचे, मालमत्ता आणि जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुभती आणि इतर जनावरे झाडाखाली, पाण्याच्या स्रोताजवळ किंवा विद्युत खांबाजवळ बांधू नये, तर त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे. जलसाठ्याजवळ किंवा नदीकाठी जाणे, मुलांना पोहण्यासाठी पाठवणे टाळावे. शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना याबाबत जागरूक करावे. पूरप्रवण क्षेत्रात प्रवेश, तसेच पाणी वाहणारे पूल किंवा नाले स्वतः अथवा वाहनासह ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. पावसादरम्यान विजेच्या तारा आणि जुन्या इमारती कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यापासून दूर राहावे, असे आवाहन लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत करण्यात आले आहे.
निम्न तेरणा प्रकल्प माकणी

माकणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील येणारा येवा लक्षात घेऊन पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आज दि. 16/08/2025 रोजी सकाळी 7.00 वाजता निम्न तेरणा प्रकल्पाचे दार क्रं 1 ,14 ,7,8,6,9,4,11,3,12 (एकूण 10 दारे) हे उघडण्यात आले असून तेरणा नदीपात्रात विसर्ग करण्यात येणार आहे. सद्यःस्थितीत दार क्रं 1,14,7,8,6,9,4,11,3,12 ( एकूण 10) ही वक्रद्वारे 10 सेंटिमीटर ने उघडणार असून एकूण 3806.56 क्यूसेक्स (107.79 क्यूमेक्स ) इतका विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.

धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे/कमी करणे बाबत निर्णय निर्णय घेतला जाणार आहे. तरी, नदी काठावरील/ पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी खबरदारी घ्यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/