
नायलॉन मांजा च्या वापरातून जीवावर बेतत आहे अशी बातमी आम्ही सकाळीच प्रकाशित केली ती आपल्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंतच एका निष्पाप जीवावर बेतलेल्या या जीवघेण्या मांजाची ही दुसरी स्टोरी
लातूर शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या हनुमान चौकात गुळमार्केट रोड वरील रंगुन बेकरी समोरील झाडावार पतंगाच्या मांजामध्ये कबुतर पक्षी अडकुन उलटा लटकेला आढळुन आला. सदरील पक्षी तीन-चार तासापासून मांजामध्ये अडकल्याचे रंगुन बेकरीचे सुमीत शिंदे यांनी सांगितले. सदर पक्षी मांजातुन सुटण्यासाठी सतत धडपड करत होता व तो उलटा लटकला असल्यामळे अर्धमेला झााला होता.
याबाबत प्राणी-पक्षी मित्र राजर्षी शाहू महाविद्यालयातील कर्मचारी मिलिंद सोनकांबळे यांनी पक्षीमित्र मेहबुब चाचांच्या सहकार्याने महापालिकेच्या अग्नीशमन विभागास फोन करुन घटनेची कल्पना दिली. पंधरा मिनिटांत अशोक पवार व त्यांचे सहकारी अग्नीशमन गाडीसह घटनास्थळी दाखल झााले व काही वेळातच त्यांनी त्या पक्षाला सुखरुप खाली काढण्यात यश आले.
पक्षाच्या पायामध्ये अडकलेला मांजा मिलींद सोनकांबळे यांनी काढुन टाकला आणि त्याला त्याच ठिकाणी सोडण्यात आले, सोडताक्षणी त्याने छानपैकी भरारी घेतली आणि दिसेनासा झााला आणि तिथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या चेहऱ्यावर हसु फुलले. वेळेवर अग्नीशमन विभागाची मदत मिळाल्यामुळे एका निष्पाप पक्षाचा जीव वाचवु शकलो त्याबददल मिलिंद सोनकांबळे अग्नीशमन विभागाचे अशोक पवार यांचे अनेकांनी आभार मानले.



