
राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सी अर्थात NTA मार्फत बी ई आणि बी. टेक. प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या जानेवारी 2025 मेन साठी पहिल्या राउंड च्या मेन परीक्षा 22 ते 28 जानेवारी 2025 दरम्यान घेतल्या जाणार आहेत.
या परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत त्यांच्या एन टी ए च्या वेबसाईटवर प्रवेश परिक्षा संबंधी आगाऊ सेंटर सूचना आणि तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
पहिल्या फेरीतील प्रवेश परीक्षेसंदर्भातील अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांना आगाऊ सेंटर सूचना आणि तारखा आता ऑनलाईन उपलब्ध झाले आहेत विद्यार्थ्यांना वेबसाईटवर जाऊन या आगाऊ सूचना प्राप्त करून घेता येतील.



