लातूर जिल्हा

महात्मा बसवेश्वर दिनदर्शिकेचे प्रकाशन

लातूर. महात्मा बसवेश्वर दिनदर्शिकेने घराघरात महात्मा बसवेश्वरांचे विचार पोहोचवले, आणि बसवेश्वरांच्या विचारांचा हा यज्ञ गत पंचवीस वर्षापासून अविरत सुरू असल्याचे प्रतिपादन प्रा सुदर्शन बिरादार यांनी केले ते काल दिनदर्शिका प्रकाशन समारंभात बोलत होते.
लिंगायत महासंघ शाखा लातूरच्या वतीने गेली 25 वर्षापासून प्रकाशित करण्यात येणारी महात्मा बसवेश्वर दिनदर्शिका याही वर्षी म्हणजे 2025 ची दिनदर्शिकेचे प्रकाशन शिवनगर येथिल लिंगायत महासंघाचे जिल्हा कोषाध्यक्ष माणिकप्पा मरळे यांच्या सह आयोजित एका कार्यक्रमात करण्यात आले. या प्रकाशन कार्यक्रमात लिंगायत महासंघाचे प्रांतअध्यक्ष प्रा. सुदर्शन बिरादार बोलता ह ेते. महात्मा बसवेश्वर दिनदर्शिका मोफत वाटण्याचा उपक्रम करत आहोत .आज अनेक घरात अन्य कॅलेंडर न घेता केवळ महात्मा बसवेश्वर दिनदर्शिकाच घेताना दिसत आहे.
बसवेश्वर दिनदर्शिका अतिशय आकर्षक पणे मांडणी केलेली ही दिनदर्शिका जिल्हाभरात व महाराष्ट्रात मोफत वितरित करण्यात येत आहे. तरी समाज बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहान लिंगायत महासंघाचे प्रांतअध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांनी केले आहे.
या वेळी समाजातील ज्येष्ठविधीज्ञ अँड मधुकर राजमाने, लिंगायत महासंघाचे प्रदेश सचिव विश्वनाथप्पा मिटकरी ,सिद्रामआप्पा पोपडे, डी बी मिटकरी ,माणिक अप्पा मरळे ,शिवकांत गंगापुरे ,रमेश वेरुळे, शिवदास लोहारे,यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/