महाराष्ट्र

लघुपट हे अभिव्यक्तीचे सशक्त माध्यम प्रा संतोष पाठारे

अभिजात लघुपट महोत्सवाचे उद्घाटन

लघुपट हे अभिव्यक्तीचे इतर कोणत्याही माध्यमापेक्षा सर्वात सशक्त माध्यम असून अतिशय अल्प वेळेत आपणास व्यक्त करावयाचे विचार अभिव्यक्ती तेवढ्या ताकतीने दाखवावी लागते म्हणून लघुपट हे चॅलेंजिंग असतात असे मत प्राध्यापक संतोष पाठारे यांनी व्यक्त केले.
ते अभिजात फिल्म सोसायटी लातूर आणि दयानंद शिक्षण संस्था लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून बोलत होते

कार्यक्रमास राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक विनोद कांबळे,सुमेध सतीश नरहरे, दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बेल्लाळे, दयानंद वाणिज्य महाविद्यालय डॉ प्रशांत मान्नीकर, कला महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. अंजली जोशी दयानंद लाॅ महाविद्यालयाच्या प्र प्राचार्या पूनम नाथांनी, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे चाऊस, आर्किटेक्ट महाविद्यालयाच्या आर्किटेक्ट प्रिती पटवारी यांची मुख्य उपस्थिती होती पुढे बोलताना त्यांनी लघुपट हे युवकांसाठी अतिशय महत्त्वाचे क्षेत्र असून या क्षेत्रात युवकांना खूप काही करता येऊ शकेल यासाठी लातूर सारख्या शहरातील युवकांनी या क्षेत्राकडे वळावं असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं. प्रारंभी अभिजात सोसायटीचे अध्यक्ष आणि शॉर्ट फिल्म फेस्टिवल चे आयोजक जितेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले त्यात सदर फिल्म फेस्टिवलच्या आयोजनामागील भूमिका सविस्तर मांडली आज आणि उद्या या अंतर्गत सुमारे 60 लघुपट प्रदर्शित केले जाणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर दुर्गा शर्मा यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/