महाराष्ट्र

प्राचार्य डॉ नागोराव कुंभार यांना भ. की . सबनीस राज्यस्तरीय सदभावना पुरस्कार जाहीर

तत्त्वज्ञानातील सर्वज्ञ, मितभाषी, शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील मानाचे पान आणि स्फटिकी व्यक्तीमत्वाचे धनी प्राचार्य डॉ नागोराव कुंभार सर यांना मानाचा समजला जाणारा भ. की. सबनीस राज्यस्तरीय सदभावना पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना या पूर्वी अनेक मानाचे आणि महत्वाचे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

योगेश्वरी शिक्षण संस्था कर्मचारी सहकारी पगारदार संस्था , आंबेजोगाई आणि जय हिंद ग्रुप, आंबेजोगाई यांच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा भ . की. सबनीस राज्यस्तरीय सदभावना पुरस्कार लातूर येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर नागोराव कुंभार यांना जाहीर झालेला आहे
जय हिंद ग्रुप चे सचिव व अध्यक्ष यांनी हा पुरस्कार जाहीर केला .
प्राचार्य डॉक्टर नागोराव कुंभार यांनी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग ,महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ , महाराष्ट्र राज्य गॅझेटिअर सदस्य आणि महाराष्ट्र शासन तत्वज्ञान व तर्कशास्त्र परिभाषा कोश समिती अध्यक्ष म्हणून त्काम केलेले आहे. ते नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पहिल्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि सामाजिक शास्त्र विद्याशाखेचे पहिले अधिष्ठाता डीन म्हणून देखील कार्य केलेले आहे .

त्यांनी आठ ग्रंथाचे लेखन व 50 ग्रंथाचे संपादन केलेले आहे . त्यांच्या
मार्गदर्शनाखाली 11 संशोधक विद्यार्थ्यांना पीएच .डी .व पाच विद्यार्थ्यांना एम फिल पदवी प्राप्त झालेली आहे.
ते महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार ,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा पहिला आदर्श शिक्षक पुरस्कार ,फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार ,प्राचार्य टी एस कडगे आदर्श प्राचार्य पुरस्कार आणि महाराष्ट्र फाउंडेशनचा 50 हजार रुपयेचा पुरस्कार आदी विविध पुरस्काराने ते सन्मानित आहेत .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/