FLash

… या लाडक्या बहिणी अपात्र कार्यवाही सुरू

माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अनेक सुरस कथा बाहेर येत आहेत. आता मात्र शासनाने विशिष्ट वर्गवारीतील लाडक्या बहिणीवर पात्रता नसतानाही लाभ घेतला असल्याने कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचारी असलेल्या 1183 लाडक्या बहिणींवर कारवाई केली जाणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये निवडणुकीपूर्वी घोषित केल्याप्रमाणे पात्र अपात्र लाडक्या बहिणीने अर्ज केले होते. सुरुवातीला कोणत्याही कसोट्या न लावता अर्ज केलेल्या बहिणींना आर्थिक लाभ देण्यात आला होता. मात्र योजनेच्या अटीनुसार शासकीय सेवेत असलेल्यांचे, आर्थिक उत्पन्न जास्त असणाऱ्या बहिणींचे अर्ज सुरुवातीला अपात्र केले नव्हते. मात्र आता या योजनेत कोणी कोणी अर्ज केले आणि कोणी कोणी आर्थिक लाभ घेतला त्याच्या अनेक रंजक कथा बाहेर येत आहेत.
18 ऑगस्ट 2025 रोजी ग्रामविकास विभागामार्फत एक पत्र काढून राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणीवर योग्य ती कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत कार्यवाही केली जाणार आहे. राज्यातील सुमारे 1183 जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाडक्या बहिणीचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आले आहे. त्यावरून आता त्यांच्यावर शिस्तभंगाची महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत कारवाई केली जाणार आहे.
सुरुवातीला 7.7 लाख बहिणींना इतर लाभ मिळत असल्याने त्यांच्या लाभात कपात करण्यात आली , त्यानंतर 2289 सरकारी कर्मचारी व अधिकारी बहिणी आणि त्यानंतर महिला साधर्म्य असलेल्या पुरुषांची नावे उघड झाली आहेत त्याच बरोबर 42 लाख महिलांना अपात्र ठरविण्यात आले असून अद्यापही विविध मार्गानी पात्रता तपासणी सुरू आहे. त्यानुसार आता जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाडक्या बहिणीचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आले आहे. अशा कर्मचाऱी बहिणीवर मुख्य कार्यकारी अधिकारी कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/