
तीन-तीन शैक्षणिक धोरणे अमलात आणून देखील शैक्षणिक क्षेत्रातील गोंधळाची स्थिती काय संपत नाही विशेषत्वाने देशात शिक्षणाच्या माध्यमातून सर्व प्रश्नांची सोडवणूक होणे हे अपेक्षित असताना नेमके तसे होत नाही आणि म्हणून मग शैक्षणिक क्षेत्रातील धरसोड वृत्ती ही या क्षेत्राला तारक ठरण्याची ऐवजी मारक ठरत असल्याचे एम एड च्या धोरणावरून सुद्धा दिसून येते संपादक

परिषदेचे अध्यक्ष प्रा. पंकज अरोरा
नवीन शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने देशभरातील विद्यापीठ आणि खाजगी विद्यापीठे केंद्रीय विद्यापीठ महाविद्यालय नवीन अभ्यासक्रम रचना करून ती 2024 पर्यंत लागू करण्यासाठी लागले आता तो अभ्यासक्रम लागू होत नाही तोपर्यंतच देश पातळीवरील राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने NCET ने नव्याने लागू केलेल्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या बाबतीत बदल करण्यात येणार असल्याचे सुतोवाच केले आहे. अशा धरसोड वृत्तीमुळे शैक्षणिक क्षेत्राचे मोठे नुकसान होत आहे.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार 2026 पासून अभ्यासक्रम हा दोन ऐवजी एक वर्षाचा करण्यात येणार आहे आणि या अभ्यासक्रमासाठीचा प्रवेश यांनी बीएड एक वर्षाची किंवा दोन वर्षाची पदवी प्राप्त केलेले आहे किंवा चार वर्षाचा एकात्मिक शिक्षक शिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे अशा विद्यार्थ्यांना एम एड च्या एका वर्षाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणार आहेत. हा बदल नवीन शैक्षणिक धोरण 2020 च्या सुसंगत असल्याचे परिषदेचे म्हणणे आहे. म्हणजेच पुन्हा येणाऱ्या कालावधीत एमएड अभ्यासक्रमामध्ये बदल होतील. अशाच प्रकारचे बदल बीएड अभ्यासक्रमाबाबत देखील परिषदेने जाहीर केलेले आहेत.



