देश -विदेश

JEE त अपयश; मग या संधी आहेत ना..

जेईई 2025 मधील पहिल्या सेशनचे निकाल जाहीर झाले असून अनेक विद्यार्थ्यांना म्हणावे तसे यश मिळाले नाही अशा अयशस्वी विद्यार्थ्यांनी खचून न जाता इतर अन्य कोणत्या मार्गाने यश मिळवता येईल ते पहा.

या अपेक्षापूर्तीची पहिली पायरी म्हणजे आयआयटी प्रवेशासाठीची जेईई परीक्षा. पहिल्या फेरीतील या परीक्षा सध्या सुरू आहेत. ही परीक्षा देशभरातील सुमारे 13 ते 15 लाख विद्यार्थी देणार आहेत. यापैकी प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होईल याची खात्री नाही. तरीपण प्रत्येक जण आपला अभ्यास, जिद्द, चिकाटी, परिश्रमाच्या जोरावर जेईई परीक्षा देत आहे. जे ई ई च्या पहिल्या आणि दुसऱ्या फेरीतून 15 लाख विद्यार्थी परीक्षा देतील असा अंदाज आहे.त्यापैकी फक्त चार टक्के म्हणजेच 60000 पेक्षा कमी विद्यार्थी आय. आय. टी., एन. आय. टी., आय. आय. आय. टी. किंवा तत्सम अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतील. उरलेल्या जवळपास 13 ते 14 लाख विद्यार्थ्यांचे काय होणार हा खरा प्रश्न.
या उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना कुठे ना कुठेतरी प्रवेश मिळतोच. पण जेईई मध्ये यश मिळाले नाही तर खचून न जाता इतर काही नामांकित संस्थामध्ये प्रवेश घेण्याची तयारी आपण केली पाहिजे. यासाठी जेथे आपल्या मुलाला किंवा मुलीला प्रवेशाची संधी शोधायला हरकत नाही. जेईई नंतर आपल्यासाठी महत्त्वाच्या संस्था मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांच्या बाबतीत माहिती घेवू.
1 MH-CET
या परीक्षेच्या माध्यमातून सुद्धा आपण चांगले गुण प्राप्त केले तर महाराष्ट्रातील दर्जेदार अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश होऊ शकतो. महा सीईटीच्या माध्यमातून राज्यातील सीओईपी, व्हीजेआयटी सारख्या नामांकित संस्थेतील प्रवेश सुलभ होऊ शकतात. शिवाय राज्यातील 300 पेक्षा जास्त अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्याची ही पहिली पात्रता परीक्षा यासाठी पुढील महिन्यापासून अर्ज दाखल करावे लागतात.
Website 👇

Home

2.BITSAT -( BIRALA Institute of Technology and science)
हे अतिशय नामांकित अभियांत्रिकी शिक्षण देणारे महाविद्यालय असून येथील प्रवेशासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेतली जाते यांच्या गोवा हैदराबाद पिलानी या ठिकाणी शाखा असून बारावी विज्ञान पीसीएम मध्ये 75 टक्के गुण आवश्यक असतात याची नोंदणी सुरू आहे
Website 👇
https://www.bitsadmission.com/bitsatmain.aspx?id=11012016

3.MET( Manipal Enternce Test)
हे देशातील एक नामांकित विद्यापीठातून या विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या मनीपाल जयपुर आणि बेंगलुरु येथील महाविद्यालयातील प्रवेशासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेतली जाते नोंदणी सुरू आहे.
Website 👇
https://www.manipal.edu/mu.html

4.ISI- (INDIAN STATISTICAL INSTITUTE)
ज्या विद्यार्थ्यांनी गणितामध्ये प्राविण्य मिळवलेला आहे, ज्यांना गणितात करिअर करायचे आहे, अशा विद्यार्थ्यांनी येथे प्रयत्न करावा. आयएसआयची भारतात पाच कॉलेजेस असून बेंगलुरु, दिल्ली, चेन्नई, तेजपूर येथील नामांकित महाविद्यालयातील प्रवेशासाठी ही प्रवेश पात्रता परीक्षा असते.
Website 👇
https://www.isical.ac.in/

5.IAT-( IISAR APTITUT TEST)
या शासकीय शिक्षण महाविद्यालयातील प्रवेशासाठी बारावी मध्ये किमान 60 टक्के गुण आवश्यक असतात. ही अतिशय नामांकित अशी महाविद्यालय आहे. देशातील पुणे, भोपाळ, कोलकत्ता, मोहाली, तिरुअनंतपुरम आणि तिरुपती येथील महाविद्यालयातील प्रवेशासाठी ही परीक्षा असते नोंदणी सुरू आहे.
Website 👇
6.WBJEE-(WEST BENGAL JOINT ENTERNCE EXAM)
महाराष्ट्रात ज्याप्रमाणे सीईटी असते त्याप्रमाणे पश्चिम बंगाल राज्यातील सुमारे 11 सरकारी विद्यापीठ खाजगी विद्यापीठे याबरोबरच 9 शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि 63 इंजिनिअरिंग महाविद्यालयातील प्रवेशासाठी ही प्रवेश परीक्षा असते. पश्चिम बंगाल राज्यातील विद्यार्थ्यांसाठी 85 टक्के तर इतर राज्यातील विद्यार्थ्यांना 15 टक्के कोटा राखीव असतो. येथे जाधवपूर इंजिनिअरिंग कॉलेज अतिशय नावाजलेले आहे.
7.VITEEE( VELLORE INSTITUTE OF TECHNOLOGY ENTERNCE EXAM)
वेल्लोर येथील नामांकित अशा अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशासाठी ही परीक्षा असते या ठिकाणी विद्यार्थ्यांना चांगले प्लेसमेंट मिळवून देण्यात या संस्थेचे देशभरात नाव आहे वेल्लोर अमरावती चेन्नई आणि भोपाळ या चार ठिकाणच्या महाविद्यालयातील प्रवेशासाठी ही परीक्षा असते विद्यार्थ्यांना प्राप्त होणाऱ्या गुणांनुसार येथे फीस आकारली जाते.
Website 👇
https://viteee.vit.ac.in/

8.NEWST – ( National Entrance Screening Test)
ही परीक्षा देशातील भुवनेश्वर आणि मुंबई येथील दोन महाविद्यालयातील प्रवेशासाठी असते अतिशय महत्त्वाच्या अशा ह्या दोन्ही संस्था अनुऊर्जेशी संबंधित अभ्यासक्रम येथे चालतात. येथे केवळ 257 जागा उपलब्ध असतात. 9.CUET- ( CENTRAL UNIVERSITIES Entrance Test)
देशातील केंद्रीय विद्यापीठांतर्गत उपलब्ध असणाऱ्या अभियांत्रिकी आणि तत्सम विज्ञान शाखेतील प्रवेशासाठी ही प्रवेश परीक्षा घेतली जाते देशातील सुमारे अडीचशे विद्यापीठांतर्गत असणारे अभ्यासक्रमासाठी ही परीक्षा होते यांतर्गत बरेच महत्त्वाचे अभ्यासक्रमाने बरेच महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे.
या वरील सर्व माहितीचा उपयोग आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या भावी शैक्षणिक दिशा ठरवण्यासाठी उपयुक्त ठरेल. यापैकी अनेक संस्थांच्या प्रवेश परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन सुरू असून काही रजिस्ट्रेशन सुरू होणार आहेत. त्या सर्वांच्या वेबसाइट्स आपल्याला त्या त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आपण त्याचा वापर करून अधिक माहिती मिळू शकाल. या व्यतिरिक्त काही अन्य संस्था आहेत त्या सर्वांची येथे माहिती देणे अशक्य आहे.
मुलांना शुभेच्छा – संपादक

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/