लेख / काव्य

त्यांची घरवापसी….

जागतिक पातळीवर जवळपास प्रत्येक राष्ट्रात कोणत्या ना कोणत्या कारणावरून अशांतता पाहायला मिळते. कधी ती मुलतत्वावरून ,कधी अतिरेकी कारवायावरून, तर कधी वंश भेदावरून तर कधी विस्तारवादी वृत्तीने ही अशांतता आपल्याला पाहायला मिळते. जवळपास 16 महिन्यानंतर इस्रायल हामास सोबत केलेले युद्धबंदीमुळे गाजा पट्टीतील लोकांची घरवापसी शक्य झाली आहे.


ठिगाऱ्यात आपल्या घराचे अस्तित्व शोधतांना

इजराइल हे अति प्रगत राष्ट्र आणि त्याच्या शेजारी असलेल्या पॅलेस्टाईन अर्थात गाजा पट्टीत प्रचंड मुलतत्ववादी विचारसरणीतून सन 1987 पासून इस्लामिक मुलतत्ववादी आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना हमास. यांच्यात अनेक वर्षांपासून संघर्षची स्थिती आहे. 7 आॅक्टोबर 2023 रोजी हमास ने इजराइल मध्ये घुसून एका कार्यक्रमात नागरिकांवर अधांधुंद गोळीबार केला. त्यात 1200 निरपराध लोक मारले गेले आणि 250 लोकांना ओलिस ठेवले होते. त्या घटनेनंतर इजराइलने गाझा पट्टीवर त्याच्यावर झालेल्या हमल्याचा प्रतिशोध म्हणून जोरदार हवाई हल्ले सुरू केले.त्यामुळे परिस्थिती बिकट होत असतानाच या संघर्षाला जातीवादाचा रंग देण्याचा प्रयत्नही झाला. यहुदी विरुद्ध मुस्लिम असा जागतिक पातळीवर प्रश्न निर्माण करण्याचा आहे प्रयत्न झाला.म्हणून मग युद्धात इराण आणि आजूबाजूच्या राष्ट्रातील दहशतवादी संघटनांनी दखल देण्याचाही प्रयत्न केला. परंतु इजराइल च्या आधुनिक शस्त्रास्त्रे आणि बाजूने अमेरिका व इतर देश खंबीर उभी असल्यामुळे आणि जागतिक राजकारणाच्या अनेक गुंतागुंतीच्या प्रक्रियेमुळे प्रत्यक्ष इतर कोणतेही राष्ट्र या संघर्षात उतरले नाहीत.
आता 19 जानेवारी रोजी ओलीस ठेवलेल्या लोकांना हामासने इजराइलला सोपवलं जाईल या आणि अन्य अटींच्या अधिन राहून युध्दबंदी जाहीर केली आहे. इजराइल ने देखील त्याच्या ताब्यात असलेली युद्ध कैदी सोडले आणि युद्धबंदी लागू झाली.
आता पंधरा-सोळा महिने सुरू असलेल्या या युद्धात बेचिराख झालेल्या गाजा पट्टीतील निर्वासित लोक मोठय़ा आशेने आपल्या घराकडे परतत आहेत. ज्यांचा या युद्धाची काडीमात्र संबंध नव्हता, ते युद्धात सामील देखील नव्हते. पण त्यांची घर मात्र गाझापट्टीत होती हा एवढाच त्यांचा दोष होता. ही युद्धबंदी झाल्यानंतर आपले आप्त, नातेवाईक, शेजारी, युद्ध कालावधीत एकमेकांपासून लांब गेलेले कुटुंबातील सदस्य हे जीवाच्या आकांताने डोळ्यात प्राण आणून आपल्या घराकडे एका डोळ्यात आसू आणि दुसर्‍या डोळ्यात हसू घेऊन परतत आहेत. त्यांच्या समोर विध्वंस झालेली शहराच्या शहरे, घरे,रस्त्याची विनाशकारी युद्धाने राखरांगोळी केली आहे. आपली आपल्या परिवाराची विस्कटलेली घडी हे घराकडे परतणारे युध्दामुळे परागंदा झालेले कसे शिवतील आणि येणाऱ्या भविष्याशी कसे दोन हात करतील हा खरा प्रश्न आहे. त्यांना उभारण्यासाठी जागतिक पातळीवरून मोठ्या आर्थिक, मानसिक आणि इतर अनेक प्रकारच्या मदतीची गरज आहे. पण गाझापट्टीत हमास सारखी दहशतवादी संघटना पाय पसरते, प्रचंड तळ उभारते आणि त्याला हे नागरिक मदत करतात. त्यामुळे त्यांच्याकडे बघण्याचा आणि मदत देण्याचा दृष्टिकोन जगाचा वेगळाच असू शकतो. पण घर वापसी करणारे हे कसे सावरू शकतील हा खरा प्रश्न आहे.
ही युध्दबंदी होईपर्यंत 50 हजार पेक्षा जास्त पॅलेस्टाईनचे जवळपास 20000 हमासचे दहशतवादी आणि इस्त्रायलमधील शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. युध्दामुळे कोणत्याही राष्ट्राचे भले होवू शकेल मात्र मानवी जीवनाचे काय. जर मानवाच्या अस्तित्वावर गंडांतर येणार असेल तर अशा विनाशकारी तांत्रिक विकासाचा आणि अवास्तव मुलतत्ववादी विचाराचा आणि विस्तारवादी मनोवृत्तीचा हव्यास कशासाठी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/