डाॅ.गणी पटेल यांना जिवनगौरव पुरस्कार प्रदान

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य, इतिहासाचे अभ्यासक डॉ.गणी पटेल यांना शब्दगंध साहित्य परिषदेच्या जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
अहिल्यानगर येथील शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने २३ व २४ मे रोजी अहिल्यानगर येथे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन घेण्यात आले. या संमेलनामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते , माजी प्राचार्य डॉ गणी पटेल यांना शब्दगंध जीवनगौरव पुरस्कार २०२६ जाहीर करण्यात आला. कृषिमंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी आ. संग्राम जगताप, महापौर ज्योतीताई गाडे, डॉ. संदीप सांगळे, शब्दगंधचे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. गणी पटेल हे चिस्तीया महाविद्यालय खुलताबाद येथे इतिहास विभाग प्रमुख, प्राचार्य म्हणून कार्यरत होते. सामाजिक, साहित्यिक व सहकार क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये कार्यरत असून अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे.
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या स्थापनेपासून मार्गदर्शक म्हणून ते कार्यरत असून मराठवाड्यामध्ये शब्दगंध च्या शाखा स्थापन करण्यात त्यांचा पुढाकार राहिलेला आहे.
त्यांच्या या सर्व समावेशक कार्याचा आढावा घेऊन शब्दगंध साहित्यिक परिषदेने यावर्षी जीवनगौरव पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे. संस्थेचे राजेंद्र उदागे, संस्थापक सुनील गोसावी, कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, डॉ.संजय पाईकराव, डॉ.अशोक कानडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे



