अभियांत्रिकीतील संधी उद्या रोटरी तर्फे व्याख्यान

शैक्षणिक क्षेत्रातील वाढती स्पर्धा, माहितीचा अभाव आणि उपलब्ध शैक्षणिक सुविधा माहित नसल्यामुळे अनेक वेळेला विद्यार्थी चुकीच्या मार्गावर जातात. अशा विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी रोटरीचा हा उपक्रम.
रोटरी क्लब लातूरच्या वतीने, रोटरी सॅटॅलाइट क्लब ऑफ लातूर, अस्पिरेशन व रोटरी वेल्फेअर सोसायटी लातूर, यांच्या वतीने अशाच शैक्षणिक क्षेत्रात, बारावी नंतर कोणत्या संधी उपलब्ध आहेत, त्या आपण कशा मिळवायच्या, या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी,
-
अभियांत्रिकी क्षेत्रातील संधी
या विषयावर या क्षेत्रातील तज्ञ डॉ. श्रीनिवास सिद्धाराम आप्पा मेतन यांचे रविवार दिनांक 22 जून 2025 रोजी मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सदर मार्गदर्शन हे राजीव गांधी चौक येथील रोटरी हॉलमध्ये सकाळी 10.30am ते 12.30pm या दरम्यान होणार आहे. बारावी पास विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात करिअरच्या संधी शोधताना सदर व्याख्यान निश्चित मार्गदर्शक ठरेल, असे रो. श्रीमंत कावळे, सचिव रो. ज्किखान कायमखानी आणि प्रकल्प प्रमुख रो. नागनाथ कलावले यांनी कळवले आहे. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.




