महाराष्ट्र

युवा खेळाडूंना क्रीडा प्रबोधिनीत प्रवेशाची संधी


खेळ ही मानवी मूळ अभिवृत्ति. आता या क्षेत्रात देखील करिअरच्या प्रचंड संधी निर्माण झाले आहेत. मोठ्या लोकसंख्येच्या भारतासारख्या देशात देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकणारे खेळाडू खूप कमी प्रमाणात आहेत. तोच धागा पकडून महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडवण्यासाठी प्रयोग सुरू आहे. युवा खेळाडूंनी या निश्चित सहभागी व्हावे.

महाराष्ट्रातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत 2025-26 साठी पुणे, कोल्हापूर, ठाणे, अमरावती, नाशिक, अकोला, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि गडचिरोली येथील क्रीडा प्रबोधिनींमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. यामध्ये हॅण्डबॉल, जलतरण, सायकलिंग, फुटबॉल, ज्युदो आणि जिम्नॅस्टिक्स या खेळांसाठी निवासी आणि अनिवासी प्रवेश 26 ते 27 जून 2025 दरम्यान 50 टक्के लेखी चाचणी आणि 50 टक्के कौशल्य चाचणीच्या आधारे दिले जाणार आहेत.

राज्यस्तरावर पदकप्राप्त किंवा राष्ट्रीयस्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व केलेले 19 वर्षांखालील खेळाडू तज्ज्ञ समितीसमोर चाचणी देऊन सरळ प्रवेशासाठी पात्र ठरतील. राज्यस्तरावर सहभागी 19 वर्षांखालील खेळाडूंना खेळनिहाय कौशल्य चाचणीत गुणानुक्रमे प्रवेश निश्चित होईल. 7 जुलै 2006 नंतर जन्मलेले आणि 8 जुलै 2025 पर्यंत 19 वर्षे पूर्ण झालेले खेळाडू प्रवेशास पात्र आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/