Third Eye

मुलांना परदेशात शिक्षणासाठी की शिक्षा म्हणून पाठवत आहोत

होतकरू गुणवंत, अभ्यासू विद्यार्थी नेहमीच उच्च शिक्षणाकडे वळतात आणि त्यांना परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी खुनावतात. त्यामुळे भारतातील दरवर्षी लाखो विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जातात. पण अलीकडे झालेल्या अभ्यासातून शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या संदर्भात मोठे प्रश्न निर्माण होत असून विद्यार्थ्यांना वंशवादाच्या अनेक घटनांना बळी पडावे लागत आहे. म्हणून पालकांनी आपल्या मुलांना परदेशी शिक्षणासाठी पाठवत आहोत की शिक्षा म्हणून पाठवत आहोत याचा विचार करणे क्रमप्राप्त ठरणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तीन वर्षात भारतातून जगातील जवळपास 90 पेक्षा अधिक देशात २०२४ मध्ये १३,३५,८७८ भारतीय विद्यार्थी परदेशात शिक्षण घेत होते.
तर २०२३ मध्ये १३,१८,९५५ आणि २०२२ मध्ये ९,०७,४०४ विद्यार्थी शिक्षणाच्या निमित्ताने अमेरिका इंग्लंड जर्मनी फ्रान्स इटली इजराइल युक्रेन .अशा जगातील वेगवेगळ्या देशात गेले होते. आपणास परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय वाढत असल्याचे दिसते. हे सर्व विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या कारणाने परदेशात शिक्षणासाठी गेलेले आहेत. त्याचे अनेक कारणे आहेत त्यात चांगली शैक्षणिक संधी, करिअरच्या संधी आणि वैयक्तिक अनुभव आर्थिक फायदा आणि कमी खर्चात होणारे शिक्षण यांचा समावेश आहे.
असे असले तरी बाहेरच्या देशातील हवामान आणि भारतीय हवामानात बदल असल्याने तेथील हवामान विद्यार्थ्यांना मानवत नसल्याने अनेक शारीरिक व्याधी जडत आहेत डोक्यावरील केस झडत असून योग्य आहाराच्या आभावी शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडत आहे.
जागतिक पातळीवर जातिवाद आणि वंशवाद वाढत असून अमेरिकेसह सर्वच देशात तो खूप डोके वर काढतो आहे. म्हणून मग या सर्वच देशात भारतीय विद्यार्थ्यांवर वंशवादातून, तिरस्कारातून, राष्ट्रवादीतून अनेक भारतीय विद्यार्थ्यांनी आपला जीव गमावला आहे. विद्यार्थ्यांकडे प्रवासी विजा, विद्यार्थी विजा किंवा ग्रीन कार्ड कोणतेही असले तरी देखील त्यांना अशा विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
भारतीय विद्यार्थ्यांना आणि त्याचबरोबर तेथे ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग (OPT) मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा वंशवादातून थेट हल्ले झाल्याचे देखील प्रकार समोर येत आहेत. एवढेच नाही तर जी कुटुंबे वीस पंचवीस वर्षापासून अमेरिकेत स्थायिक आहे त्यांच्या लहान मुलांना देखील शाळेत वंशवादाच्या भेदांचा सामना करावा लागत आहे.
भारतात सरासरी 30 अंश सेल्सिअस तापमान असते. कधी ते 40 च्या वर तर कधी 15 अंश सेल्सिअस इतके असते. तर USA, UK सारख्या देशात 0 अंश सेल्सिअस ते 15 अंश सेल्सिअस दरम्यान असते. त्यामुळे हवामानातील बदलाचा परिणाम शारीरिक व्याधी जडत असतात., या बरोबरच सांस्कृतिक भेद, रुपयाचे अवमूल्यन झाल्याने खर्चात वाढ, सामाजिक वातावरण देखील वेगळे असते. OPT अंतर्गत मिळालेले काम आणि त्याचे तास याचाही मेळ बसत नाही. म्हणून विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात ताण सहन करावा लागतो.
यासर्व गोष्टी बरोबर आपले घर, हट्ट पुरवणारे, सुख दुखःत साथ देणारे आई – वडील, भाऊ – बहीण यापैकी कोणीही जवळपास नसल्याने आपला आनंद किंवा नैराश्य कोणाला सांगणार असे मानसिक प्रश्न देखील भेडसावत आहेत. म्हणून आपण आपल्या मुलांना परदेशी शिक्षणासाठी पाठवत असताना दहा वेळा विचार करून निर्णय घ्यावा.
एकीकडे वाढत जाणाऱ्या डॉलरच्या, युरोच्या किंमती आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देशादेशातील वाढत जाणारे तणाव यातून युद्धसदृश्य स्थिती दहशतवादाचा सामना महागाई आणि अस्थिरता या गोष्टी देखील आपल्या मुलांच्या भवितव्याच्या आड येऊ शकतात. त्यामुळे देशांतर्गत उपलब्ध असलेल्या अनेक गुणवत्तापूर्ण शैक्षणिक पर्यायांचा विचार यापुढील कालावधीत सर्वांच्याच फायद्याचा ठरेल यात शंका नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/