लातूर जिल्हा

भारतीय संविधानामुळेच देश एकसंघ-ॲड.प्रा.बी.व्ही. मोतीपवळे

संविधान सभेची निर्मिती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानाप्रती असलेले योगदान हे अत्यंत महत्वपूर्ण होते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच एकमेव शिल्पकार आहेत.शिवाय संविधानाने दिलेले मूलभूत हक्क, अधिकार व मार्गदर्शक तत्वे यावर प्रकाश टाकूनआजच्या परिस्थितीमध्ये ते कायम राहणे काळाची गरज असल्याचे सांगितले. भारताचे संविधान सर्वश्रेष्ठ आहे व यामुळेच देशात स्वातंत्र्य, समता, बंधुता, प्रेम आणि न्याय टिकून आहे आणि ते कायम चिरकाल राहावे यासाठी सर्वांनी जाती, धर्म, पंथ, भाषा वर्ण विरहित तसेच एकमेकांचा द्वेष न करता एकजुटीने राहणे आवश्यक असल्याचे मत जेष्ठ विधिज्ञ ॲड.प्रा.बी.व्ही. मोतीपवळे यांनी व्यक्त्‍ा केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स लीग, लातूर तथा लातूर जिल्हा वकील मंडळ, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने 79 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा वकील मंडळाच्या सभागृहात ‘भारतीय स्वातंत्र्य आणि संविधानापुढील आव्हाने’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष ॲड. वाय. डी. जगताप यांची उपस्थिती होती. तर प्रमुख उपस्थिती म्हणून माजी जिल्हा सरकारी वकील ॲड.जांबुवंतराव सोनकवडे, विशेष सरकारी वकील ॲड.लक्ष्मण एन शिंदे हे मंचावर उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा वकील मंडळाच्या उपाध्यक्षा ॲड.मनीषा दिवे पाटील,सहसचिव ॲड.निलेश मुचाटे,कोषाध्यक्ष ॲड. गणेश कांबळे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
मान्यवरांचे स्वागत डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स लीगच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 नोव्हेंबर 1949 रोजी त्याकाळी संसदेत केलेले भाषण त्याच्या प्रती आणि बुके देऊन करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स लीगचे सदस्य ॲड. राजेंद्र लातूरकर यांनी केले.

पुढे ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समाजसुधारक, अर्थतज्ञ, पत्रकार, कायदेपंडित, तत्वज्ञानी, विचारवंत, साहित्यिक, विद्यार्थी असे बहुआयामी महापुरुष होते त्यांचे देशाप्रती असलेल्या योगदानाबद्दल येथील प्रत्येक भारतीयांनी समरण केले पाहिजे अशीही मांडणी केली.
आज देशात जात, धर्म, भाषा, स्वातंत्र्य यावरून निर्माण होत असलेली परिस्थिती अत्यंत चिंताजनक तसेच भीतीदायक आहे यासाठी संविधानिक मार्गानेच यावर मात करणे हा एकमेव उपाय आहे आणि यामाध्यमातूनच आपला भारत देश सुजलाम सुफलाम देश बनविणे हे आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय संविधानाची निर्मिती करीत असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली नाही त्यांनी संविधान निर्माण करण्यास प्रथम प्राधान्य दिले यामुळेच ते किती महान व्यक्तिमत्व होते हे यावरून सिद्ध होते असेही मत ज्येष्ठ विधिज्ञ प्रा. बी. व्ही.मोतीपवळे यांनी व्यक्त केले.
आम्ही भारताचे लोक या ब्रीद वाक्यापासून त्यांनी संविधानाची सुरुवात केली यावरूनच त्यांची महती आणि देशभक्ती प्रकट होते असेही मत व्यक्त केले.
कार्यक्रमात ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. शिवकुमार बनसोडे, ॲड.राम केंद्रे, ॲड.अभय खानापुरे, ॲड.बी. ई कवठेकर,ॲड. देविदास बोरुळे पाटील,ॲड. प्रवीण पाटील,ॲड.प्रदीप गायकवाड, ॲड.प्रशांत गायकवाड,ॲड.कल्पना भुरे,ॲड. गायत्री नल्ले, ॲड.चिंते मॅडम, ॲड.भोसले मॅडम,ॲड.राम गजधने, ॲड.सिद्धेश्वर धायगुडे, ॲड.गुरुसिद्ध मिटकरी, ॲड.सविता मोतीपवळे, ॲड.विश्वजीत पाटील ॲड.संजय कांबळे,ॲड. अजय कलशेट्टी,ॲड. नितीन लोभे, ॲड.गोपाळ रेड्डी, ॲड.सिद्धार्थ दंडे, ॲड.प्रवीण कांबळे, ॲड.प्रीतम कांबळे, ॲड.दीपक माने,ॲड. श्रीकांत मोमले,ॲड.राहुल कांबळे आदी विधिज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. सचिन डी. कांबळे यांनी केले तर आभार ॲड.शिवकुमार एम बनसोडे यांनी मानले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/