श्रीश्रेत्र भक्तीस्थळ येथे वीरशैव लिंगायतांची गोलमेज परिषद 10 जून ला

अहमदपूर येथील श्री क्षेत्र भक्ती स्थळ येथे वीरशैव लिंगायतांची गोलमेज परिषद 10 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आली असून या गोलमेज परिषदेत वीरशैव लिंगायतांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

अहमदपूर येथिल राष्ट्रसंत परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी सातत्याने जनगणनेच्या कॉलम मध्ये वीरशैव लिंगायत धर्माची नोंद व्हावी या हेतूने महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर 1969 सालापासून विविध प्रकाराची आंदोलन केली.परंतु त्यांच्या या मागणीला यश आले नाही.
राष्ट्रसंत परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे देश आणि परदेशामध्ये मध्ये लाखो अनुयायी आहेत त्यामुळे त्यांच्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी आणि 2026 27 या कालावधीत होणाऱ्या जातनिहाय आणि आणि धर्माचा स्वतंत्र सात नंबरचा कॉलम दिला असल्याने त्यामध्ये वीरशैव लिंगायत धर्माची नोंद समस्त समाज बांधवांनी करावी याकरिता,
या कामी महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील अनेक मठाधिपती, प्रबोधनकार, विद्वान, विचारवंत, कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक यांच्यासह शिवा संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही वीरशैव लिंगायत धर्माची गोलमेज परिषद येथील श्रीक्षेत्र भक्ती स्थळ येथे दिनांक 10 जून 2026 वार बुधवार सकाळी नऊ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
या गोलमेज परिषदेमध्ये विशेष करून तीन मुद्द्यावर चर्चा होणारा असून त्यामध्ये 202627 च्या जनगणने मध्ये धर्म व जातीची नोंद कशी करावी, सबंध जगाला बाराव्या शतकात समतेचा संदेश देणारे महात्मा बसवेश्वरांचा बाराव्या शतकातील अनुभव मंडप आणि परसू कट्टा मुक्त करून जगभरातील पर्यटकांना पाहण्याकरिता खुला करावा, प्रतिवर्षी अक्षय तृतीया या दिवशी जगभर महात्मा बसवेश्वर यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करावी.
यासह समाजाच्या इतरही महत्त्वाच्या मागण्या संदर्भात विचार विनिमय करण्याच्या हेतूने आणि पुढील आंदोलनाची मूर्त दिशा ठरवण्याच्या उदात्त हेतूने या वीरशैव लिंगायत धर्म धर्माची गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
गोलमेज परिषदेला सर्व समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे जाहीर आवाहन भक्ती स्थळाचे प्रमुख परमपूज्य आचार्य गुरुराज स्वामी यांनी एका प्रसिद्धी पत्रका द्वारे केले आहे .



