
उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने आज एमबी पटवारी ज्येष्ठ पत्रकार तथा लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष एम बी पटवारी यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी दर्पण दिनानिमित्त उत्कृष्ट वार्ता शोध आणि उत्कृष्ट विकास वार्ता मराठवाडा स्तरीय पुरस्कार दिले जातात. आज या पुरस्कारांच्या वितरण कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार तथा लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष एम बी पटवारी यांचा जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार खा. डॉ. शिवाजीराव काळगे, माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांच्या हस्ते देवून सन्मानित करण्यात आले. याच कार्यक्रमात जेष्ठ पत्रकार रामराव गवळी आणि चंद्रचकोर पेन्सिलवार यांचाही सन्मान करण्यात आला.

तालुका पत्रकार संघातर्फे देण्यात येणारे उत्कृष्ट शोध वार्ता आणि उत्कृष्ट विकास वार्ता पुरस्कारही यावेळी विजेत्यांना प्रदान करण्यात आले. उत्कृष्ट शोध वार्ता आणि उत्कृष्ट विकास वार्ता पुरस्कारांची निवड प्रा शिवशंकर पटवारी, प्र जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप तथा विभागीय माहिती कार्यालय, सहायक संचालक (माहिती) डॉ. श्याम टरके



