विद्यार्थांना मिळणार कौशल्य प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी
दयानंद कला महाविद्यालयाचा उपक्रम


लातूर: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नोकरीच्या संधी निर्माण करण्यासाठी दयानंद कला महाविद्यालय, लातूर आणि जगमंगल सोशल फाउंडेशन पुणे संचलित स्वयमतेज अकॅडमी, लातूर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
या कराराअंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकास, जीएसटी टॅली/कंप्युटर ट्रेनिंग, इंग्रजी संभाषण, जीवन कौशल्य आणि मूल्ये, तसेच संवाद कौशल्यांसाठी विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यावसायिक जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये मिळतील. तसेच, या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांत नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्या डॉ. अंजली जोशी, इतिहास विभाग प्रमुख डॉ. रमेश पारवे,दयानंद शिक्षण संस्थेचे सेंट्रलाइज्ड हेड ट्रेनिंग आणि प्लेसमेंट राहुल आठवले, स्वयमतेज अकॅडमीचे संचालक आकाश सोनकांबळे, प्रशिक्षक किशोर महाजन, आजम पठाण यांसह मान्यवर उपस्थित होते.



