

लिबरल पक्षाच्या अंतर्गत वाढत्या दबावामुळे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे आपल्या राजीनामे नंतर त्यांनी जोपर्यंत त्यांचा लिबरल पक्ष नवीन नेता निवडू शकत नाही तोपर्यंत ते पदावर राहतील आणि 24 मार्चपर्यंत संसद स्थगित केली जाईल – किंवा निलंबित केली जाईल असे घोषित केले.
कॅनडात आगामी काळात निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकीत देश खरा नेता निवडीसाठी पात्र असेल आणि मला हे समजले आहे की, जर मला अंतर्गत लढाई लढायची असेल तर त्या निवडणुकीत मी चांगला पर्याय असू शकत नसल्याचे त्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. ट्रूडो यांच्या राजीनाम्या नंतर कॅनडात मात्र मोठ्या हालचालींना वेग आला आहे
कॅनडाचे पंतप्रधान असताना त्यांनी भारताच्या संदर्भात घेतलेली भूमिका ही अत्यंत वादग्रस्त ठरली होती. भारत आणि कॅनडा या दोन्ही देशातील राजकीय संबंध ताणले गेले होते. खलिस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येमध्ये भारत सरकारचा हात असल्याचा आरोप पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केल्यानंतर भारत आणि कॅनडाचे संबंध आणखी खालावलेली होते. सप्टेंबर 2024 मध्ये दोन्ही देशांनी एकमेकांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी देखील केली होती . आता कॅनडामध्ये कोण पंतप्रधान होईल आणि त्यांचे भारतासोबत कसे संबंध प्रस्थापित होतील हे पाहणे आवश्यक ठरणार आहे शिवाय याच वर्षाच्या अखेरीस कॅनडामध्ये निवडणुका होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर ट्रूडो यांना राजीनामा द्यावा लागल्याची चर्चा माध्यमातून दिसून येते



